मोबाईलच्या वापरामुळे मुलांचे मैदानी खेळाकडे दुर्लक्ष:दिलीप गुंदेचा, शहरातील सविता रमेश फिरोदिया प्रशालेच्या वार्षिक क्रीडा मेळाव्याचे उद्घाटन

2 hours ago 1
आज प्रत्येक व्यक्तीने प्रतिकारशक्ती वाढवण्याची गरज निर्माण झाली आहे, त्यासाठी नियमित व्यायाम व मैदानी खेळ खेळले पाहिजे. सध्या मोबाईलमुळे मुलांचे मैदानी खेळाकडे दुर्लक्ष होताना दिसते. त्यामुळे आजारी रुग्णांचे प्रमाणही वाढत आहे. त्यामुळे मुलांनी अभ्यासाबरोबर जास्तीत जास्त वेळ मैदानी खेळ खेळले पाहिजे. शरीर स्वास्थ्य व एकाग्रतेसाठी मैदानी खेळ उत्तम पर्याय आहेत. संस्थेच्या वतीने विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम राबविले जातात. विविध क्रीडा स्पर्धांमध्ये शाळेच्या विद्यार्थ्यांना सहभागी केले जाते. विद्यार्थीही खेळाचे उत्कृष्ट प्रदर्शन करून जिल्हा, विभागीय, राज्य पातळीवर यशस्वी होत आहेत, याचा संस्थेला अभिमान असल्याचे प्रतिपादन शिशू संगोपन संस्थेचे अध्यक्ष दिलीप गुंदेचा यांनी केले. शिशू संगोपन संस्थेच्या सविता रमेश फिरोदिया प्रशालेच्या वार्षिक क्रीडा मेळाव्याचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष दिलीप गुंदेचा यांच्या हस्ते झाले. यावेळी उपाध्यक्ष दशरथ खोसे, सचिव र. धों. कासवा, सहसचिव राजेश झालानी, खजिनदार अ‍ॅड. विजयकुमार मुनोत, मुख्याध्यापिका योगिता गांधी, माध्यमिक मुख्याध्यापक दत्तात्रय कजबे, सहकार क्रीडा मंडळाचे रावसाहेब बाबर आदी उपस्थित होते. उपाध्यक्ष दशरथ खोसे म्हणाले, की विद्यार्थ्यांना अभ्यासाबरोबरच मैदानी खेळासाठी नेहमीच प्रोत्साहित केले जाते. मैदानी खेळाने शारीरिक क्षमतेसह बौद्धिक क्षमता वाढण्यास मदत होत असते. विद्यार्थ्यांच्या कला, क्रीडा गुणांना प्रोत्साहन देऊन ते विकसित करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे त्यांनी सांगितले. सहसचिव राजेश झालानी म्हणाले, की विद्यार्थ्यांनी फक्त स्पर्धेपुरते मैदानावर न राहता कायमस्वरूपी मैदानी खेळ खेळले पाहिजे. त्यामुळे विद्यार्थी हा चांगला खेळाडू तयार होऊ शकतो. तसेच सहकार क्रीडा मंडळाने या स्पर्धा घेण्यासाठी आमच्या शाळेसाठी हे मैदान उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचे आभार मानले. रावसाहेब बाबर यांनी क्रीडा मेळाव्याच्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. प्रास्ताविकात मुख्याध्यापिका योगीता गांधी यांनी विद्यार्थ्यांसाठी राबवण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. सूत्रसंचालन वैशाली पार्ले यांनी, तर भाऊराव डोळस यांनी आभार मानले.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article