मोसमी पावसाला पूर्णविराम; सरासरीपेक्षा 117 मिमी जादा:अपेक्षित हाेता 639 मिमी; प्रत्यक्षात पडला 811.2 मिमी‎

1 hour ago 1
यंदाचा मोसमी पावसाचा हंगाम हवामान खात्याच्या लेखी ३० सप्टेंबर रोजी संपला असून, अंतिम आकडेवारी समोर आली आहे. जून ते सप्टेंबर या दरम्यान सरासरी ६९३.७ मिमी पाऊस पडणे अपेक्षित असतानाही प्रत्यक्षात मात्र ८११.२ मिमी पावसाची नोंद झाली. काटेपूर्णा प्रकल्प १०० टक्के भरल्याने अकोलेकरांना रोज पाणी पुरवठ्याचा मार्ग प्रशस्त झाला आहे. सध्या तिसऱ्या दिवशी पाणी पुरवठा होतो. तसेच जिल्ह्यातील सर्व प्रकल्प तुडुंब भरले असून, रब्बी हंगामात सुमारे ३० हजारापेक्षा जास्त हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. मात्र, पावसाचे दिवस कमी होणे, संततधार सुरू राहणे, अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील पिकांचे नुकसान झाले आहे. गत दहा वर्षात आतापर्यंत सहा वेळा ७०० मि.मी. पेक्षा जास्त पाऊस झाला असून चार वर्षानंतर यंदा ८११ मिमी इतका विक्रमी पाऊस झाला. यंदा जिल्ह्यात उन्हाळ्यात तापमान ४४ अंश सेल्सियसपेक्षा जास्त नोंदवण्यात आले होते. जास्तीत जास्त वेळा पारा ४२ अंश सेल्सियसपेक्षा जास्त नोंदवण्यात आला. दरम्यान, जून महिन्यापासूनच पावसाने दमदार हजेरी लावली. काही दिवसांचा खंड सोडल्यास जुलै व ऑगस्टमध्ये दमदार पाऊस झाला. अनेकदा अतिवृष्टी झाली. एकूणच यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. काटेपूर्णा १०० वान ९९ मोर्णा १०० निर्गुणा १०० उमा १०० दगडपारवा १०० तालुका अपेक्षित प्रत्यक्षात (मिमी.) अकोट ६७९.० ९०५.२ तेल्हारा ६६४.५ ७३५.६ बाळापूर ६१४.२ ७७४.८ पातूर ८०१.२ ९३३.६ अकोला ७०३.४ ७७६.७ बार्शीटाकळी ६९९.६ ८३७.० मूर्तिजापूर ७११.२ ७६२.२ जिल्हा ६९३.७ ८११.२ असा आहे प्रकल्पनिहाय साठा

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article