Rupali Thombare : राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटात गेल्या काही दिवसांपासून नाराजी नाट्य सुरू आहे. एक व्यक्ती एक पदावरून सध्या दोन महिला पदाधिकाऱ्यांमध्ये ठिणगी पडली आहे. लाडक्या बहिणींसाठी गुलाबी झालेल्या एनसीपीच्या या गटाला या नाराजीवर अद्याप काही उपाय साडला नसल्याचे सध्या तरी दिसते.
रुपाली पाटील ठोंबरे नाराज का?
लाडक्या बहिणींसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाने राज्यात गुलाबी मोहीम राबवली. जनसंवाद यात्रेच्या रुपाने अजितदादांनी उभा आडवा महाराष्ट्र पालथा घातला. लाडक्या बहिणींना भाऊबीजेची ओवळणी आम्हीच कशी दिली यासाठी दादा गटाने महाराष्ट्र पिंजून काढला. पण दादा गटातील दोन बहिणींची नाराजी जाहीर झाल्याने त्यावर आता कसा तोडगा काढावा असा पेच पक्षातील वरिष्ठांना पडला आहे. काय आहे या नाराजीचे कारण? का होत आहे एक व्यक्ती एक पदाची मागणी?
रुपाली पाटील ठोंबरे नाराज का?
हे सुद्धा वाचा
मी आधी सुद्धा मुद्गा मांडला होता इतर ही पक्षात लाडक्या बहिणी आहेत. परंतु एक व्यक्ती एक पद देण्यात यावं. काल मला चाकणकर बोलल्या की मी बाहेरची आहे, त्यामुळे हर्ट झाले. मग मी जाते बाहेर. मात्र दादा मला बोलले की मी तुम्हाला पक्षप्रवेश दिला आहे त्यामुळे तुम्ही तुमचं काम करा. मला दादांवर अभिमान की आम्ही 121 त्यांना तक्रार करू शकता. एवढा जर मोठे नेते बोलत असतील नाराज नव्हते मात्र एक खंत होती की मी बाहेरची यावर दादा बोलले. मानकर यांच्यासोबतही त्यांनी चर्चा केली, दादा यावर नक्कीच मार्ग काढतील, असा विश्वास रुपाली पाटील ठोंबरे यांनी व्यक्ती केला.