यंदा सप्तशृंगी देवीच्या मूर्तीला मिळतेय अधिक पसंती:उत्पादन खर्च वाढल्याने मूर्तींच्या किमती 15 ते 20 टक्क्यांनी वाढल्या

1 hour ago 1
सध्या नवरात्रोत्सवाची जोरदार तयारी सुरू असून ३ ऑक्टोबर रोजी नवरात्रोत्सवाला प्रारंभ होत आहे. मंगळवारी अकोल्यात देवींच्या मूर्तीवर अखेरचा हात मूर्तिकारांनी फिरवला. उत्पादन खर्च वाढल्याने यंदा देवीच्या मूर्तींच्या किमतींमध्ये तब्बल १५ ते २० टक्क्यांनी वाढ झाली असून पाचशे रुपयांपासून ते २१ हजार रुपयांपर्यंत देवीच्या मूर्तींच्या किमती पहायला मिळत आहेत. यात सर्वाधिक पसंती सप्तशृंगी देवीच्या मूर्तीला मिळत आहे. नवरात्रोत्सवात घराघरात नवरात्रीच्या दिवसांत लहान मूर्ती बसवल्या जातात. तर अनेक मंडळं देखाव्याबरोबरच देवीच्या विलोभनीय मूर्ती बसवत असतात. यासाठी गेल्या महिनाभरापासून देवीच्या मूर्ती तयार करण्यात येत आहेत. अकोल्यात मंगळवारी कौलखेड, कुंभारवाडामध्ये मूर्तिकारांची देवीच्या मूर्तीवर अखेरचा हात फिरवण्याची लगबग होती. यात सप्तशृंगी, दुर्गा, रेणुका, महालक्ष्मी, कालिका देवी, महिषासुरनी अशा विविध मूर्ती तयार करण्यात आल्या आहेत. दुर्गा देवीची सर्वाधिक मागणी असून त्यापाठोपाठ सप्तशृंगी देवी मूर्तीस जास्त मागणी असल्याचे विक्रेत्यांकडून सांगण्यात आले. मूर्तींमधून विविध देवीच्या रूपांचे दर्शन यंदा मूर्तिकारांकडून सप्तशृंगी, दुर्गा, रेणुका, महालक्ष्मी, कालिका देवी, महिषासुरमर्दिनी अशा विविध मूर्ती तयार करण्यात आल्या आहे. सप्तशृंगी देवीच्या मूर्तीस सर्वाधिक मागणी असून त्यापाठोपाठ दुर्गा देवीची मूर्तीस जास्त मागणी असल्याचे विक्रेत्यांकडून सांगण्यात आले.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article