यवतमाळ : भरधाव ट्रकची दुचाकीला धडक; पती-पत्नीचा जागीच मृत्यू

5 hours ago 1

खटेश्वरजवळ भरधाव कारने महिला सरपंचासह मुलाला उडवल्याने दोघे गंभीर जखमी झाले. File Photo

पुढारी वृत्तसेवा

Published on

22 Nov 2024, 12:16 pm

Updated on

22 Nov 2024, 12:16 pm

यवतमाळ : बाभुळगाव तालुक्यातील कोठा फत्तेपूर येथील रस्त्याच्या कामावर गिट्टी भरून नेण्याऱ्या ट्रकने दुचाकीस्वारास धडक दिली. या धडकेत दुचाकीवरील पती-पत्नी जागीच ठार झाले. ही घटना गुरुवारी सायंकाळी बाभूळगाव तालुक्यातील कोठा फत्तेपूर नजिक घडली.

महादेव शंकर हटवार (वय ५५ ) मायाबाई महादेव हटवार (वय ५२) असे मृतांची नावे असून हे दोघेही कोठा फत्तेपूर येथील रहिवासी आहेत. गुरुवारी महादेव हटवार व त्यांची पत्नी मायाबाई हे दाम्पत्य अमरावती जिल्ह्यातील धामणगाव नजिक असलेल्या निंभोरा गावी नातेवाईकाडे दुचाकीने अंत्यविधीसाठी गेले होते. तेथून परत येत असताना वेगाने येणाऱ्या ( क्रमांक एम.एच. २७ वी एक्स ९३६४ ) ट्रकने त्यांच्या दुचाकीला जबर धडक दिली. यात दुचाकीवरील दोघेही खाली कोसळले, दरम्यान त्याच ट्रकखाली आल्याने दोघेही जागीच गतप्राण झाले.

या घटनेची माहिती मिळताच मृत महादेव यांचा धाकटा भाऊ देविदास शंकर हटवार काही गावक-यांसह घटनास्थळी पोहचला. मृतकांना बाभूळगाव ग्रामीण रुग्णालयात आणले. या प्रकरणी देविदास शंकर हटवार यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी ट्रक चालक शेख हसन शेख गफुर (वय ४७ रा. चांदुररेल्वे) याचेविरूध्द निष्काळजीपणे वाहन चालवून अपघात केल्याचा गुन्हा दाखल करून अटक केली. अधिक तपास पोलीस निरीक्षक एल. डी. तावरे यांच्या मार्गदर्शनात सहायक फौजदार दिपक आसकर करीत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article