योजना बंद पाडण्याची भाषा करणाऱ्या मविआला थारा देऊ नका- विखे:संगमनेर तालुक्यातील 54 कोटी रुपयांच्या विकास कामांचे भूमिपूजन

6 days ago 4
लोकसभा निवडणुकीत खटाखट पैसे देणाऱ्या काँग्रेस नेत्यांना हरियाणातील बहिणींनी घरचा रस्ता दाखवला. राज्यातही योजना बंद करण्याची भाषा करणाऱ्यांना दारावर उभे करू नका. महायुती सरकार लाडक्या भाऊ बहिणींच्या पाठिशी खंबीरपणे उभे असून सर्व योजनांच्या लाभार्थीना पटापट पैसे देण्याचे काम होत असल्याचे प्रतिपादन महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी केले. तालुक्यात महायुती सरकारने मंजूर केलेल्या ५४ कोटींच्या कामांचे लोकार्पण आणि भूमिपूजन तसेच नारीशक्ती सन्मान सोहळ्याप्रसंगी मंत्री विखे बोलत होते. भाजपचे शहराध्यक्ष श्रीराम गणपुले, तालुकाध्यक्ष वैभव लांडगे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आबासाहेब पवार, शिवसेनेचे रामभाऊ राहाणे, संजय गांधी योजनेचे अध्यक्ष अमोल खताळ, लाडकी बहीण योजनेचे शरद गोर्डे, डॉ. अशोक इथापे, तहसीलदार धीरज मांजरे आदी उपस्थित होते. मंत्री विखे म्हणाले, शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणाकडे पाऊल टाकले. या योजनेतील लाभापासून वंचित महिलांना सप्टेंबर, ऑक्टोबर व नोव्हेंबर या तीन महिन्यांचे पैसे येत्या काही दिवसांत महिलांच्या खात्यात जमा होणार आहेत. या योजनेत संगमनेर तालुक्यात १०१ कोटी रूपयांचा लाभांचे वितरण करण्यात आले. पीक विमा, दूध अनुदान योजनेचे पैसेही शेतकऱ्यांच्या खात्यात वितरित करण्यात आले. राज्यात महाविकास आघाडी सरकार अडीच वर्ष सतेवर होते. कोणताही निर्णय राज्याच्या हिताचा त्यांनी घेतला नाही. शासनाने अंगणवाडी सेविका, आशा वर्कर यांचे मानधन वाढवण्यात आले. महिलांना एसटी भाड्यात पन्नास टक्के सवलत दिल्याने तोट्यातील एसटी फायद्यात आली‌‌‌. मुख्यमंत्री तीर्थदर्शन भेट योजनेतून येत्या काळात जिल्ह्यातील ८०० ज्येष्ठ नागरिकांना अयोध्या यात्रा घडवून आणली जाणार आहे. मुख्यमंत्री बळीराजा योजनेत शेतकऱ्यांच्या कृषिपंपाचे वीजबील माफ करण्यात आल्याने शून्य रकमेचे बील दिले. शहरातील गंगामाई घाट परीसरात दशक्रिया विधी घाटाचे भूमिपूजन मंत्री विखे यांच्या उपस्थितीत करण्यात आले. सुमारे ४० लाखांच्या निधी यासाठी विखे यांनी मंजूर केला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते अशोकराव सराफ, प्रा. एस. झेड. देशमुख, सुभाष कोथमिरे, शिरीष मुळे, पुरोहीत संघाचे भाऊ जाखडी आदी उपस्थित होते. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे संगमनेर तालुक्यात १ लाख ३५ हजारपेक्षा जास्त लाभार्थी असल्याची माहिती प्रास्ताविकात तहसीलदार धीरज मांजरे यांनी दिली. यावेळी मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या. तालुक्यातील विविध विकासकामांचे लोकार्पण पालकमंत्री राधाकृष्ण विखेंच्या हस्ते जनजीवन जीवन मिशनच्या १५ कोटींच्या कामांचे लोकार्पण करण्यात आले. महिला बचत गटांना प्रातिनिधिक स्वरूपात फूड प्रोसेसिंग युनिटचे वाटप करण्यात आले. बांधकाम कामगार कामगारांला प्रातिनिधिक स्वरूपात साहित्याचे वाटप करण्यात आले. गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना, प्रधानमंत्री आवास योजना, प्रधानमंत्री पीक विमा योजना या योजनेतील लाभार्थ्यांना लाभाचे प्रातिनिधिक स्वरूपात वितरण करण्यात आले. बचत गटांना प्रातिनिधिक स्वरूपात बँक कर्जाचे वाटप करण्यात आले.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article