रेणुका मातेच्या दर्शनासाठी लागतात रांगा:जनुना येथील ग्रामस्थांचे बनली आराध्य दैवत

6 days ago 4
शहरापासून जवळच असलेल्या जनुना येथील ग्रामस्थांचे आराध्य दैवत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या व नवसाला पावणारी अशी आख्यायिका असलेल्या जनुना येथे श्री रेणुका माता संस्थान आहे. या ठिकाणी ३ ऑक्टोबरपासून नवरात्रोत्सवास सुरूवात झाली आहे. या उत्सव काळात धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. जिल्ह्यासह इतर जिल्ह्यांतील भाविक मातेच्या दर्शनासाठी येत आहेत. त्यामुळे मंदिरात भाविकांची एकच गर्दी होत आहे. नवरात्री उत्सवाच्या काळाज पहाटे ५ वाजेपासून रात्री उशिरापर्यत हे मंदिर भाविकांसाठी उघडे ठेवण्यात आले आहे. दररोज सकाळी सात वाजता व संध्याकाळी सात वाजता मंगल वाद्यांसह मातेची आरती करण्यात येत आहे. मंदिराचे पुजारी म्हणून दगडु कोळसे हे काम पाहत आहेत. देवीची स्थापना कोणी केली, कोणत्या वर्षी झाली, या बाबतची माहिती असणारे सध्या हयात नाहीत. परंतु, जे वयोवृध्द आज हयात आहेत, त्यांच्या सांगण्यानुसार जवळपास दिडशे वर्षापूर्वीची ही देवी असल्याचे सांगतात. मंदिराचा निसर्गरम्य परिसर मंदिरात स्थापन केलेली रेणुका मातेची मूर्ती व त्यावर चढविलेला साज श्रृंगार पाहून मन प्रसन्न होत असल्याचे भाविक सांगत आहेत. या मंदिरात जाताच मनाला शांती मिळते. मंदिर परिसरात वड, आंबा, चिकु, कडुलिंब यासह इतर झाडे मोठी झाल्याने मंदिराचा परिसर निसर्गरम्य झाला आहे. नितांत श्रध्देने भाविक रेणुका मातेला साकडे घालतात. नवसाला पावणाऱ्या रेणुका मातेचे दर्शन घेतल्याने भक्ताचा भाव जागृत होतो. काही भाविक या उत्सव काळात आपली सेवा देतात. भाविकंाची गैरसोय होऊ नये, यासाठी विश्वस्त मंडळ नियमित लक्ष देत आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article