लातूर हादरले, भरदिवसा कोयत्याचे वार करून खून

2 hours ago 1

लातूर हादरले, भरदिवसा कोयत्याचे वार करून खून File Photo

पुढारी वृत्तसेवा

Published on

18 Oct 2024, 10:13 am

Updated on

18 Oct 2024, 10:13 am

लातूर, पुढारी वृत्तसेवा : शहरातील दयानंद महाविद्यालयाच्या गेट समोर गुरुवारी (दि.१७) सकाळी साडेदहाच्या सुमारास एकाच्या गळ्यावर कोयत्याने वार करून त्याचा खून करण्यात आला. अनिल ऊर्फ शिवाजी त्र्यंबक देवकर (वय ४०) असे त्याचे नाव आहे. आरोपी फरार आहेत.

गेल्या काही दिवसांतील हा तिसरा खून असून सदैव वर्दळ असलेल्या परिसरात भरदिवसा हा थरार घडल्याने शहर हादरले आहे. मागील प्रकरणाचा राग मनात धरून हा प्रकार झाल्याचे फिर्यादीत म्हटले असले तरी हा खून नेमका कशामुळे झाला? याचा तपास पोलिस करीत आहेत.

अजय सुनील मुद्दे (वय २५), कृष्णा सुनील मुद्दे (वय ३०) पदमिनी सुनील मुद्दे अशी आरोपींची नावे असून त्यांच्या विरोधात शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. आरोपी फरार आहेत.

गुरुवारी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास अजय मुद्दे व कृष्णा मुद्दे हे दयानंद गेट परिसरात आले व त्यांनी तेथे असलेले अनिल ऊर्फ शिवाजी त्र्यंबक देवकर यांच्या गळ्यावर कोयत्याने जोरदार वार केले यात अनिल देवकर रक्ताच्या थारोळ्यात को- सळले व जागीच मरण पावले व हल्लेखोर फरार झाले. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक पाटील हे करीत आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article