लेटरबॉम्बमुळे आमदार सतीश चव्हाणांची हकालपट्टी होणार:राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तटकरेंचे संकेत; प्रशांत बंब यांच्या विरोधात गंगापूर विधानसभा लढवण्याची शक्यता

1 day ago 1
गंगापूर मतदारसंघातून निवडणूक लढण्याची इच्छा असलेले अजित पवार गटातील मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार पक्षात नाराज असल्याचे दिसून येत आहे. त्यांनी लिहलेल्या पत्रामुळे त्यांच्यावर दोन दिवसात कारवाई होईल असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी म्हटले आहे. दरम्यान अजित पवार गटाने त्यांच्यावर कारवाई केली तर ते शरद पवार यांच्या गटात जात तुतारी हाती घेतील अशी चिन्हे सध्या दिसून येत आहे. कारण गंगापूर मतदारसंघ हा गेली अनेक वर्षे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष लढवत आला आहे. सतीश चव्हाण तुतारी हातात घेऊन निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची चर्चा गेली अनेक दिवस मतदारसंघात सुरू आहे, तिला तटकरेंच्या वक्तव्याने वजन प्रात्प झाले आहे. लेटरबॉम्बमुळे आमदार सतीश चव्हाणांची होणार हकालपट्टी राष्ट्रवादीत बंड झाल्यानंतर अजित पवारांसोबत गेलेले मराठवाडा पदवीधरचे आमदार सतीश चव्हाण यांनी आचारसंहिता लागताच आपल्याच सरकारविरोधात सूर आळवायला सुरुवात केली आहे. त्यामुळे त्यांची राष्ट्रवादीतून हकालपट्टी होण्याचे संकेत आहेत. ‘बहुजनांचे प्रश्न सुटतील, या उद्देशाने आम्ही महायुती सरकारमध्ये सहभागी झालो. मराठा, धनगर, ओबीसी, आदिवासी, मुस्लिम आरक्षणाच्या प्रश्नावर सरकार मार्ग काढेल अशी अपेक्षा होती. मात्र सरकार यावर मार्ग काढू शकले नाही, बहुजनांचे प्रश्न सोडवू शकले नाही’, अशी खंत चव्हाण यांनी पत्रकाद्वारे व्यक्त केली. त्याची राष्ट्रवादीने दखल घेतली आहे. त्यांच्यावर एक- दोन दिवसांत कारवाई होईल, असे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे म्हणाले. नाराजीचे कारण गंगापूर मतदारसंघ आमदार सतीश चव्हाण संस्थाचालक असून अजितदादांचे कट्टर समर्थक आहेत. त्यांना गंगापूरमधून निवडणूक लढवायची आहे. पण तिथे भाजपचे आमदार प्रशांत बंब आहेत. त्यामुळे युतीतून चव्हाणांना तिकीट मिळू शकत नाही. त्यामुळे चव्हाण हे शरद पवार गटात जाऊन तिकीट घेण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. गेली अनेक दिवस आपल्या आमदार निधीतून ते या मतदारसंघात कामे करत आहेत. गाव भेटीदेखील करत असल्याचे दिसून येत आहे. कन्नड, वैजापूर, पश्चिम उद्धवसेना तर फुलंब्री काँग्रेसकडे‎ महाविकास आघाडीच्या घटक ‎‎पक्षातील म्हणजे उद्धवसेना, ‎‎काँग्रेस, शरद पवार गटांमध्ये ‎‎जिल्ह्यातील चार मतदारसंघाबाबत‎ निश्चिती झाल्याची माहिती सूत्रांनी‎ दिली आहे. त्यामध्ये शहरातील पश्चिम‎तर ग्रामीण भागातील फुलंब्री, वैजापूर, ‎‎कन्नड या मतदारसंघाचा समावेश‎ आहे, तर पाच मतदारसंघाबाबत‎ अजूनही चर्चा सुरु आहे. सध्या ‎‎शिवसेनेकडे पश्चिम, वैजापूर आणि‎ कन्नड तर फुलंब्री मतदारसंघ‎ काँग्रेसकडे असेल, अशी माहिती‎सूत्रांनी दिली. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला गंगापूर मतदारसंघ मिळेल अशी चर्चा आहे. महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे.या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांच्या राजकीय हालचालींना वेग आला आहे. यात आता छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर मतदारसंघ चर्चेत आला आहे. या मतदारसंघात इच्छुकांची भाऊ गर्दी झाल्याचे बघायला मिळत आहे. हे आहेत सर्वपक्षीय इच्छुक लेाकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभेकडे इच्छुकांचे डोळे लागले आहेत. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर मतदारसंघात सर्वच राजकीय पक्षाच्या इच्छुकांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. मविआत प्रमुख 3 तर महायुतीत दोघांना या मतदारसंघातून आपल्याला उमेदवारी मिळावी अशी अपेक्षा असल्याचे दिसून येत आहे. भाजपचे प्रशांत बंब हे या मतदारसंघाचे विद्यमान आमदार असताना अजित पवार गटाचे विधान परिषद सदस्य सतीश चव्हाण हे या मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. त्यांनी या मतदारसंघात दौरे सुरू केले आहेत. ते शरद पवार गटाकडून निवडणूक लढण्याची शक्यता आहे. कारण महायुतीमध्ये विद्यमान आमदार प्रशांत बंब यांनाच उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. तर मविआकडून काँग्रेसचे किरण पाटील डोणगावकर, ठाकरे गटाच्या देवयानी कृष्णा पाटील डोणगावकर तर शरद पवारांच्या पक्षाचे डॉ. ज्ञानेश्वर नीळ यांना मतदारसंघात निवडणूक लढण्याची इच्छा आहे. एकदा अपक्ष तर दोनदा भाजपकडून विजयी गंगापूर विधानसभा मतदारसंघात आमदार प्रशांत बंब हे 2009 च्या निवडणूकीत अपक्ष म्हणून निवडून आले. त्यानंतर 2014 आणि 2019 मध्ये भाजपच्या चिन्हावर ते पुन्हा निवडून आले. आमदार प्रशांत बंब हे उच्चशिक्षित आहेत. त्यांच्यकडे बी.कॉम. आणि एम.बी.ए. च्या पदव्या आहेत. वाचनाची आवड असलेले आमदार प्रशांत बंब हे आपल्या मतदारसंघात युवक, शेतकरी, महिलांसाठी मेळाव्यांचे आयोजन करण्यात पुढाकार घेतात. तिकीट मिळाले तर नक्की लढवणार कृष्णा पाटील डोणगावकर म्हणाले की, मविआत जर ठाकरे गटाला ही जागा सुटली तर आम्ही नक्की लढवणार आहोत. महिला म्हणून देवयाणी डोणगावकर यांना संधी मिळावी, अशी आमची इच्छा आहे. मतदारसंघात आमचे रोज दौरे सुरू आहेत. तर साखर कारखान्याच्या माध्यमातून मतदारसंघात शेतकऱ्यांसाठी काम करत आहोत... 15 वर्षांपासून बंब यांचे वर्चस्व गंगापूर- खुलताबाद दोन तालुक्याचा मिळून एक विधानसभा मतदारसंघ आहे. गंगापूर मतदारसंघातील जातीय समीकरणांवर लक्ष दिल्यास या मतदारसंघात मराठा समाजाचे प्राबल्य असल्याचे पहायला मिळते. त्याबरोबरच माळी, दलित–मुस्लिम, धनगर यांच्यासह इतर समाजही या मतदारसंघात आहेत. 2009 पासून या मतदारसंघात प्रशांत बंब हे आमदार आहेत. 2019 ची निवडणुक जिंकत त्यांनी मतदारसंघात हॅट्रिक केली आहे. ​​​​​​​ प्रशांत बंब यांनी 2009 मध्ये अपक्ष निवडणूक लढवली त्यांना 35.72 टक्के म्हणजे 53067 मते मिळाली. या निवडणुकीत त्यांनी शिवसेनेचे विद्यमान आमदार अण्णासाहेब माने पाटील यांचा 23499 मतांनी पराभव केला. पण या निवडणुकीत अपक्ष लढलेले कृष्णा डोणगावकर यांना 23786 मते मिळाली. या निवडणुकीत राष्ट्रवादीचे कुंडलिकराव पांडुरंग माने हे चौथ्या क्रमांकावर होते. त्यांना 17327 मतदान पडले. 2014 मध्ये प्रशांत बन्सीलाल बंब यांनी 30.13 टक्के म्हणजे 55483 इतके मतदान घेतले. मतदानाचा टक्का जरी कमी झाला असला तरी त्यांना पडलेल्या मतदानात वाढ झाली. यावेळी शिवसेनेचे अंबादास दानवे यांना 38205 तर राष्ट्रवादीचे कृष्णा डोणगावकर यांना 33216 मते मिळाली. तर काँग्रेसच्या उमेदवाराने 16 हजारांहून जास्त मते घेतली. 2019 मध्ये प्रशांत बंब 2014 पेक्षा दुप्पट म्हणजे जवळपास 1 लाख 7193 मते मिळाली. या निवडणुकीत बंब यांच्या विरोधकांनी एकत्र येत माजी आमदार संतोष माने यांना पुढे केले. त्यांना 72,222 इतके मतदान मिळाले. 2019 मध्ये बंब यांची हॅट्रिक तर झालीच पण गेल्या 2 निवडणुकीपेक्षा जास्त मतांनी त्यांचा विजयही झाला.​​​​​​​ ​​​​​​​ मविआची उमेदवारी मिळेल? 2024 च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार संदीपान भुमरे यांना या विधानसभा मतदारसंघातून 94 हजार 419 मते मिळाली आहेत. तर ठाकरे गटाचे चंद्रकांत खैरे यांना जवळपास 53 हजार मते मिळाली आहेत. त्यापाठोपाठ एमआयएम आणि वंचित बहुजन आघाडीला मतदान झाले. 2019 मध्ये प्रशांत बंब विरोधकांना एकत्र आणण्यात आमदार सतीश चव्हाण यांचा हात होता असे म्हटले जाते. तिथूनच त्यांनी मतदारसंघात साखरपेरणी केल्याची चर्चा सुरू झाली. पण यावेळी राज्यातील राजकीय वातावरण बदलले आहे. त्यांत इच्छुकांची भाऊ गर्दी यामुळे सतीश चव्हाणांना हे समीकरण जोडता येणार का? त्यांना मविआतून उमेदवारी मिळेल का? अशी चर्चा मतदारसंघात सुरू झाली आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article