वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघात ठाकरे गटाचा उमेदवार:झिशान सिद्दिकींच्या विरुद्ध वरुण सरदेसाई लढत होण्याची शक्यता

1 day ago 1
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांमध्ये जागावाटप तसेच उमेदवारांची घोषणा करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. महाविकास आघाडीमधील ठाकरे गटाने वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघात वरुण सरदेसाई यांची उमेदवारी जाहीर केली आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसकडून झिशान सिद्दिकी वांद्रे पूर्वमधून निवडणून आले असून ते विद्यमान आमदार आहेत. वरुण सरदेसाई यांच्या उमेदवारीची घोषणा शिवसेना ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी गटप्रमुखांच्या मेळाव्यात यासंदर्भातील घोषणा केली आहे. अनिल परब म्हणाले, मी काही दिवसांपूर्वी साहेबांना भेटलो. त्यानंतर आम्ही सगळेच पदाधिकारी त्यांना भेटलो. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी वरुण सरदेसाई यांचे नाव निश्चित केले आहे, अशी माहिती अनिल परब यांनी दिली. दरम्यान, झिशान सिद्दिकी यांनी २०१९ साली कॉंग्रेस पक्षाकडून विधानसभा निवडणूक लढवत आमदार म्हणून निवडणून आले आहेत. मात्र काही दिवसांपूर्वीच त्यांचे वडील बाबा सिद्दिकी यांची हत्या झाली आहे. बाबा सिद्दिकी यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला होता. त्यांच्या हत्येनंतर आता झिशान सिद्दिकी हे देखील अजित पवारांच्या राष्ट्रवादीत जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. झिशान सिद्दिकी जर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात गेले तर त्यांना अजित पवार गटाकडून उमेदवारी दिली जाऊ शकते. असे झाल्यास वरुण सरदेसाई विरुद्ध झिशान सिद्दिकी अशी लढत वांद्रे पूर्व मतदारसंघात रंगण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणुकांची घोषणा होताच आता महाविकास आघाडीमध्ये जागावाटपास गती मिळाली असल्याचे दिसत आहे. महाविकास आघाडीच्या जागावाटपात शिवसेना ठाकरे गटाला मुंबईमध्ये जास्त जागा मिळण्याची शक्यता आहे. महायुती सरकारची जागावाटपा प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आली असून लवकरच उमेदवारांची घोषणा केली जाणार असल्याचे समजते.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article