वृक्षप्रेमी संतप्त:रस्ता रुंदीकरणासाठी ब्रिटिशकालीन पाच झाडांची कत्तल

2 hours ago 1
शहरातील बसस्थानक चौक ते जुनी नगरपरीषद-उपजिल्हा रुग्णालयापर्यंत रस्त्याच्या दुर्तफा ऑक्सिजन देणारी कडूनिंबाची ३० पेक्षा जास्त झाडे आहेत. ही सर्व झाडे ब्रिटिशकालीन आहेत. दरम्यान रस्ता रुंदीकरण व सुशोभीकरणाच्या नावाखाली पाच झाडांची कत्तल करण्यात आली. नागरिकांनी प्रचंड विरोध केल्यामुळे उर्वरित झाडे वाचवली गेली. माहिती मिळताच वृक्षप्रेमी तथा जलवृक्ष चळवळीचे संकल्पक विजयराव विल्हेकर, अॅड. विद्यासागर वानखडे, मनोज तायडे, अनिरुद्ध वानखडे, बंडू शर्मा, अंकुश वाकपांजर, दीपक गवई, प्रवीण कावरे, मालीनी पाटील, डॉ.महेंद्र कांबळे, सिंधू विल्हेकर घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी न.प. प्रशासक नंदू परळकर व उपस्थित अधिकारी यांना सदर प्रकरण न्याप्रवीष्ट असल्यामुळे न्यायालयीन आदेशाची मागणी केली. त्यामुळे काहीवेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दुसऱ्ऱ्यांदा बेकायदेशीर कारवाईची घटना मंगळवारी पहाटे सहा वाजता नगरपालिका प्रशासनाकडून दुसऱ्यांदा हा प्रकार घडला. याआधीही २९ सप्टेंबर २०२१ रोजी बेकायदेशीररीत्या तीन झाडांची कत्तल करण्यात आली होती.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article