वेटरला मारहाण केल्याने मित्राचा खून:हॉटेल मालकाने कोयत्याने केली हत्या, पुण्यातील घटना
2 hours ago
1
हॉटेलमध्ये येऊन वेटरला बेदम मारहाण केल्याच्या रागातून झालेल्या वादातून हॉटेल मालकाने आपल्या मित्राचा कोयत्याने खून केल्याची घटना पुणे जिल्ह्यातील तळेगाव चाकण रस्त्यावर इंदोरी बायपास येथील हॉटेल जय मल्हार समोर घडली. प्रसाद उर्फ किरण अशोक पवार (वय २७, रा. कान्हेवाडी, ता. मावळ,पुणे) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. या घटनेत मयताचा मित्र अभिषेक अशोक येवले (वय 31, रा. कानेवाडी, ता. मावळ,पुणे) हा गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अक्षय दत्तात्रय येवले (वय ३०, रा. कुंडमळा, ता. मावळ,पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रणजीत जाधव यांनी सांगितले की, तळेगाव ते चाकण दरम्यान इंदोरी बायपास येथे असलेल्या हॉटेल जय मल्हार येथे मंगळवारी रात्री साडे दहा वाजताच्या सुमारास प्रसाद उर्फ किरण पवार आणि त्याचा मित्र अभिषेक येवले यांनी जय मल्हार हॉटेलमधील वेटरला किरकोळ कारणावरून बेदम मारहाण केली होती. प्रसाद, अभिषेक आणि हॉटेल मालक अक्षय हे मित्र आहेत. तर अक्षय आणि अभिजीत हे एकमेकांचे चुलत भाऊ आहेत.मारहाण झाल्यानंतर वेटरने हॉटेल मालक अक्षय येवले यांना याबाबत दिली. हॉटेल मालक अक्षय याने प्रसाद पवार व अभिषेक येवले यांना फोन करून हॉटेल मध्ये येऊन भांडण करू नको असे सांगितले होते. त्यावरून फोनवरच त्यांच्यात शिवीगाळ झाली होती. प्रसाद व अभिषेक हॉटेल मधून गेल्या नंतर रात्री साडेअकरा वाजता प्रसाद व अभिषेक हे धारदार कोयता घेऊन हॉटेल जवळ पुन्हा आले. त्यावेळी हॉटेल मालक अक्षय येवले हे हॉटेल बंद करून थांबलेला होता.त्यावेळी हॉटेल मालक अक्षय येवले व त्यांच्यात वादावादी होऊन आरोपी अक्षय येवले याने त्यांच्या हातातील कोयता घेऊन दोघांनाही गंभीर जखमी केले. या घटनेची माहिती मिळाल्यावर तळेगाव एमआयडीसी पोलिस घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी जखमींना प्राथमिक आरोग्य केंद्र तळेगाव दाभाडे व त्यानंतर पवना हॉस्पिटल येथे दाखल केले .त्यावेळी जखमी प्रसाद उर्फ किरण अशोक पवार याचा मृत्यू झाला. तर अभिषेक हा गंभीर जखमी झाला आहे. पोलिसांनी अक्षय येवले याला अटक केली आहे. तळेगाव एमआयडीसी पोलिस पुढील तपास करीत आहेत.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)