शिवसैनिक गद्दारांना भूतबंगल्यात गाडणार; भिवंडीत विनायक राऊत यांचा घणाघात

2 hours ago 2

गद्दारांनी कितीही आदळआपट केली तरी लोकसभा निवडणुकीपेक्षाही वाईट स्थिती त्यांची विधानसभा निवडणुकीत होणार आहे. भिवंडी लोकसभा क्षेत्रातील शिवसैनिक गद्दारांना धडा शिकवण्यासाठी सज्ज आहेत. मातोश्रीच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्या गद्दारांना त्यांच्या भूतबंगल्यात गाडल्याशिवाय शिवसैनिक शांत बसणार नाहीत, असा घणाघात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, माजी खासदार विनायक राऊत यांनी केला. भिवंडी लोकसभा क्षेत्रातील शिवसेना पदाधिकाऱ्यांची विधानसभानिहाय आढावा बैठक त्यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

भिवंडी लोकसभा क्षेत्रामध्ये भिवंडी पूर्व, भिवंडी पश्चिम, भिवंडी ग्रामीण, शहापूर, कल्याण पश्चिम या विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो. या सर्वच मतदारसंघांचा आढावा घेण्यासाठी शिवसेना नेते विनायक राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली भिवंडीमधील जिल्हा मध्यवर्ती शाखेत आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीला सर्वच विधानसभा मतदारसंघातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठक झाल्यानंतर पत्रकारांशी बोलताना विनायक राऊत यांनी सांगितले की, भिवंडी लोकसभा मतदारसंघातील सर्व विधानसभा क्षेत्रात शिवसैनिक आणि पदाधिकारी विधानसभा निवडणुकीसाठी सज्ज झाले आहेत. लोकसभा निवडणुकीप्रमाणेच विधानसभा निवडणुकीतही शिवसैनिक गद्दारांना चारीमुंड्या चीत करणार आहेत. खोके सरकारच्या बनवाबनवीमुळे सर्वसामान्य जनता नाराज झाली आहे. जनतेची ही नाराजी मतदान यंत्रातून बाहेर पडणार आहे, असेही विनायक राऊत यांनी यावेळी स्पष्ट केले. याप्रसंगी भिवंडी लोकसभा संपर्कप्रमुख-माजी आमदार रुपेश म्हात्रे, कृष्णकांत कोंडलेकर, जिल्हाप्रमुख विश्वास थळे, जिल्हाप्रमुख मनोज गगे आदी उपस्थित होते.

जनता शिवसेनेच्याच पाठीशी
आगामी विधानसभा निवडणूक नजरेसमोर ठेवून खोके सरकारकडून आश्वासनांची खैरात केली जात आहे. मात्र त्याचा कोणताच फायदा गद्दारांना निवडणुकीत होणार नाही. गद्दारांच्या दडपशाहीला न जुमानता जनता शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या मागे खंबीरपणे उभी राहणार आहे, असा विश्वासही शिवसेना नेते आणि माजी खासदार विनायक राऊत यांनी यावेळी व्यक्त केला.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article