शिवार फेरी; 40 हजार शेतकऱ्यांनी जाणून घेतले अत्याधुनिक तंत्रज्ञान:आज अखेरचा दिवस, शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा- कुलगुरू

2 hours ago 2
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात शिवार फेरीच्या दुसऱ्या दिवशी ४० हजारहून अधिक शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञान जाणून घेतले. या दिवशी अभिनेता आमिर खान यांनी शनिवारी सकाळी नऊ वाजताच शिवाय फेरीसाठी नोंदणी करून प्रत्यक्ष प्रत्येक विभागाला भेट देत विद्यापीठाचे तंत्रज्ञान जाणून घेतले व शास्त्रज्ञांसोबत चर्चा केली. कुलगुरू शरद गडाख यांनी शाश्वत ग्रामविकासासाठी सर्वांच्याच एकात्मिक प्रयत्नांची गरज प्रतिपादित केली. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या स्थापना दिनाचे औचित्य साधत तीन दिवसीय शिवार फेरीचे आयोजन करण्यात आले आहे. दुसरे दिवशी विदर्भातून गडचिरोली पासून बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी प्रगत कृषी तंत्रज्ञान जाणून घेण्यासाठी प्रचंड गर्दी केली होती. पाणी फाउंडेशनच्या कार्याचा गौरव करताना मिटकरी यांनी अशा उपक्रमांची गरज देखील अधोरेखित केली तर आमदार अमित झनक यांनी विद्यापीठाच्या प्रगत तंत्रज्ञानाची व शेतकरी हिताच्या दृष्टीने राबवित असलेल्या विस्तार कार्याची प्रशंसा केली. २२ सप्टेंबर रोजी शिवार फेरीचा समारोप होणार असून पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. शिवार फेरीसाठी प्रत्येक पीकाचे प्रात्यक्षिक दाखवण्यासाठी व नवीन तंत्रज्ञान सांगण्यासाठी विद्यापीठाचे संशोधक आहेत. कापूस, ज्वारी, सोयाबीन, या प्रमुख पिकांसह भाजीपाला वर्गीय पिके, तृणधाण्ये, फळबागा यासह २२० पिकांचे प्रात्यक्षिक शेतकऱ्यांसाठी उपलब्ध केले आहेत. बाहेरगावहून आलेल्या शेतकऱ्यांसाठी जागोजागी पाणी व बचतगटांच्या माध्यमातून माफक दरात जेवणाची व्यवस्था केली आहे. अधिकाधिक शेतकरी बंधू-भगिनींनी शिवार फेरीचा लाभ घ्यावा, अशी विनंती संचालक विस्तार शिक्षण डॉ. धनराज उंदीरवाडे यांनी केली आहे. शेतकऱ्यांसाठी चर्चासत्र चर्चासत्र कार्यक्रमादरम्यान शेतकऱ्यांनी तेलबिया , कडधान्य औषधी व सुगंधी वनस्पती रोगशास्त्र तसेच कृषी अभियांत्रिकी विषयक प्रश्न विचारले. यावेळी विद्यापीठातील संबंधित विषयाच्या शास्त्रज्ञांनी त्यांची उत्तरे देऊन शेतकऱ्यांचे शंका समाधान केले.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article