शेतकऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न, गुन्हा दाखल:पीक पंचनाम्याचे पैसे नवीन नियमानुसार देण्याची मागणी

6 days ago 4
शेतात २२० केव्ही आणि ४०० केव्ही चे दोन टॉवर उभारण्यात आले. ते उभारतांना शेतातील आंबा आणि चिंचेची झाडे तोडण्यात आली. त्याची भरपाई पिक पंचनाम्यानूसार न देता शासनाच्या नवीन निर्णयानूसार द्यावा, यासाठी महापारेषणच्या हर्सुल पावर हाऊससमोर आत्मदहनाचा प्रयत्न करणाऱ्या एकाला सुरक्षा रक्षकांनी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. अशोक बाबुराव राठोड (४५, रा. थापडीतांडा ता.पैठण) असे आत्महदह करण्याचा प्रयत्न करणाऱ्या शेतकाऱ्याचे नाव आहे. प्रकरणात महापारेषणचे हर्सुल पावर हाऊसचे कार्यकारी अभियंता अनंत चंद्रकांत पाठक (४२) यांनी फिर्याद दिली. त्यानूसार, ७ ऑक्टोबर रोजी दुपारी अशोक राठोड यांनी एक पञ दिले. त्यात फिर्यादीची थापटीतांडा परिसरातील गट क्रं. ३४ येथे २२० आणि ४०० केव्हीचे वाळुज-जालना विद्युत वाहीनीसाठी दोन टॉवर उभारण्यात आले आहेत. त्या टॉवरमुळे त्यांच्या शेतातील आंबे आणि चिंचेची सुमारे १५० झाडे तोडण्यात आली. त्यासाठी त्यांना पिक पंचनाम्यानूसार नव्हे तर नविन शासन निर्णयानूसार मोबदला देण्यात यावा. व मोबदला देण्यास टाळाटाळ करणाऱ्या तत्कालीन अधिकारी आणि त्यांना पाठीशी घालणाऱ्या फिर्यादी यांना हटविण्यासहह इतर मागण्या मान्य कराव्यात यासाठी ४ ते १० सप्टेंबरपर्यंत अशोक राठोड हे हर्सुल पावर हाऊस येथे उपोषणाला बसले होते. मुख्य अभियंता नसीर कादरी यांनी त्यांचे उपोषण सोडवतांना एक पञ दिले. माञ त्यानंतरही राठोड यांना न्याय मिळत नसल्याचे त्यांनी १० ऑक्टोबर रोजी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास हर्सुल पावर हाऊस परिसरात आत्मदहनाचा प्रयत्न करित असल्याचे पञ मुख्य अभियंता कादरी यांना दिले. त्यानूसार राठोड यांनी अंगावर ज्वलनशिल पदार्थ ओतून आत्मदहानाचा प्रयत्न केला असता तेथे उपस्थित सुरक्षा रक्षकांनी त्यांना पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. प्रकरणात सिटीचौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास हवालदार गडवे करीत आहेत. …………………………………

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article