श्रीरंग, श्रावणी ठरले फिरत्या चषकाचे मानकरी:जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत 70 विद्यार्थी सहभागी; निकिता, समर्थ दुसऱ्या स्थानी‎

1 day ago 1
फुलंब्री तालुक्यातील वाघोळा येथील श्री रामेश्वर विद्यालय आणि कर्मयोगी शेषराव पाटील गायकवाड स्मृती प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात पार पडली. मंगळवारी झालेल्या या स्पर्धेत जिल्ह्यातील ७० शाळेतील ७० विद्यार्थ्यांनी स्पर्धेत सहभाग नोंदवला. यादरम्यान अंजनडोहच्या संत गाडगेबाबा आश्रमशाळेची श्रावणी संतोष शेजूळ विजेती ठरली. माध्यमिक गटात प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या श्रावणीचा मान्यवरांच्या हस्ते फिरता चषक आणि रोख पारितोषिक देऊन गौरव करण्यात आला. तसेच प्राथमिक गटामध्ये सिडको येथील धर्मवीर संभाजी विद्यालयाचा श्रीरंग कौसडीकर फिरत्या चषकाचा मानकरी ठरला. या स्पर्धेचे उद्घाटन एमजीएम हॉस्पिटलचे अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. गिरीश गाडेकर यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी अध्यक्षस्थानी डॉ. सर्जेराव ठोंबरे, पंडित दीनदयाळ शिक्षण संस्थेचे सचिव निवृत्ती गावंडे, मेधाताई नाईक यांची प्रमुख उपस्थिती होती. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे नेतृत्वगुण विकसित करणे आणि त्यांच्यातील संवादकौशल्य वाढीस लावणे यासाठी आयोजकांनी ही स्पर्धा आयोजित केली होती. स्पर्धेत जिल्ह्यातील शाळांमधून प्रत्येकी एक प्रतिनिधी सहभागी होता. स्पर्धेनंतर मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना ट्रॉफी व प्रमाणपत्र देताना मान्यवर. माध्यमिक गटात विजेते : पहिला क्रमांक : श्रावणी संतोष शेजूळ, द्वितीय क्रमांक : निकिता अजिनाथ आगलावे, तृतीय क्रमांक : वैष्णवी विनोदअप्पा लकडे. प्राथमिक गटातील विजेते पहिला क्रमांक : श्रीरंग नरेंद्र कौसडीकर, द्वितीय क्रमांक : समर्थ भागीनाथ तुपे, तृतीय क्रमांक : दिव्या कमलाकर लोखंडे. या दोन्ही गटातील विजेत्यांना रोख स्वरुपामध्ये आयोजकांच्या वतीने पारितोषिक देण्यात आले.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article