सत्तास्थापनेपूर्वीच महायुतीमध्ये वादाची ठिणगी:शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या आमदारांमध्ये आरोप-प्रत्यारोपवरून जुंपली
2 hours ago
1
सध्या मुख्यमंत्री पदाबाबत चर्चा सुरू असताना महायुतीच्या दोन आमदारांमध्ये जुंपल्याचे पाहायला मिळाले. शिवसेनेचे नवनिर्वाचित आमदार महेंद्र थोरवे आणि राष्ट्रवादीच्या आमदार आदिती तटकरे यांच्यात शाब्दिक चकमक झाल्याचे समोर आले. महेंद्र थोरवे यांनी सुनिल तटकरे यांच्यावर टीका केल्यानंतर आदिती तटकरे यांनी त्यांना प्रत्युत्तर दिले आहे. महेंद्र थोरवे काठावर वाचलेत, त्यांनी आपला मतदासंघ सांभाळावा, असा पलटवार त्यांनी केला. यश मिळाल्याची हवा डोक्यात जाऊ देऊ नका, असा सल्लाही आदिती तटकरे यांनी थोरवे यांना दिला. मी महायुतीत असूनही माझ्या पराभवासाठी काही अदृश्य शक्ती कार्यरत होत्या, असा आरोप महेंद्र थोरवे यांनी सुनिल तटकरेंवर केला होता. त्यावर सुनिल तटकरे यांच्या कन्या आदिती तटकरे यांनी जोरदार पलटवार केला. महेंद्र थोरवे काठावर वाचले. जरा का इकडे तिकडे झाले असते, तर मग त्यांना त्यांची जागा कळली असती. त्यामुळे मी त्यांना फारसा महत्त्व देत नाही. त्यांनी त्यांचा मतदारसंघ सांभाळावा. यश मिळाल्याची हवा डोक्यात जाऊ देऊ नये, असा सल्ला आदिती तटकरे यांनी दिला. यशाचा आम्ही नम्रतेने स्वीकार करतोय
यश नम्रतेने स्वीकारायचा हवे. मी 82 ते 83 हजार मताधिक्याने निवडून आले आहे. पण या यशाचा आम्ही नम्रतेने स्वीकार करत आहोत. यश किती डोक्यात जाऊ द्यायचे, हे ज्यांनी त्यांनी ठरवायचे आहे, असा टोला आदिती तटकेर यांनी थोरवे यांना लगावला. राज्यात आता महायुतीचे सरकार येत आहे. आमच्या पक्षातून कोण कुठला मंत्री होणार, हे आमच्या पक्षाचे नेते ठरवणार आहे. स्थानिक आमदार हे ठरवत नाही, असेही त्या म्हणाल्या. काय म्हणाले होते महेंद्र थोरवे?
दरम्यान, आमदार महेंद्र थोरवे कर्जत-खालापूर मतदारसंघातून विजयी झाले आहेत. त्यानंतर बोलताना त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. महायुतीमध्ये असूनही सुनील तटकरे यांनी गद्दारी केल्याचे थोरवे म्हणाले होते. माझ्या पराभवासाठी अनेक अदृश्य शक्ती कार्यरत होत्या. मी महायुतीत असूनही मला पाडण्यासाठी प्रयत्न केले. परंतु माझ्या निष्ठावंत शिवसैनिकांनी त्यांचा डाव उलथून टाकला. मी जिंकलो आणि माझ्या मतदासंघात सुनील तटकरे यांचा पराभव झाला, असे थोरवे म्हणाले होते.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)