समाज सक्षम असेल तरच प्रतिकार करू शकतो- सुमंत आमशेकर:मलकापूर येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमीनिमित्त उत्सव‎

2 hours ago 1
समाज सक्षम असेल तरच प्रतिकार करू शकतो. तसेच देशातील काही विघातक शक्तींच्या कुटील योजना उघड करताना त्यांनी मजहब आणि रिलीजनचा आधार घेऊन देश फोडण्याचे व धर्मांतराचे प्रयत्न होत असल्याचे सांगुन बांगलादेश आणि नेपाळमधील स्थितीचे उदाहरण दिले. जगभरातील ३० देशांत हेच प्रयत्न झाले आणि भारतावरही असेच प्रयत्न केले जात आहेत, असे प्रतिपादन सुमंत आमशेकर यांनी केले. मागील १३ ऑक्टोबर रोजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पथसंचलन मोठ्या उत्साहात पार पडले. सायंकाळी पाच वाजता सुरू झालेल्या या संचलनात ३५० पूर्ण गणवेशधारी स्वयंसेवकांनी पाऊस सुरु असताना नगरातून घोषच्या तालावर शिस्तबद्ध पथसंचलन केले. नगरातील संघप्रेमी नागरिकांनी विविध ठिकाणी फुलांचा वर्षाव करून संचलनाचे उत्साहात स्वागत केले.संचलनानंतर विजयादशमी उत्सवाला प्रारंभ झाला. या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी चैतन्य ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचे मॅनेजिंग डायरेक्टर प्रसन्न अशोक देशपांडे होते, तर मार्गदर्शक म्हणून पश्चिम क्षेत्र प्रचारक सुमंत विनायक आमशेकर उपस्थित होते. तर विचार मंचावर तालुका संघचालक ज्ञानदेव पाटील, नगर संघचालक दामोदर लखाणी, आणि नगरसह संघचालक राजेश महाजन उपस्थित होते. शस्त्र पूजनानंतर स्वयंसेवकांचे समूहगीत झाले. यावेळी आशुतोष जोशी यांनी वैयक्तिक गीत, अभिषेक काकड याने अमृतवचन तर आशिष महाजन यांनी संस्कृत सुभाषित सादर केले. तर शाम उप्पल यांनी मुख्य शिक्षक म्हणून काम पाहिले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि परिचय नगर संघचालक दामोदर लखाणी यांनी करून संघाच्या धर्म जागरण, गौरक्षा, पर्यावरण, ग्रामविकास, समरसता, आणि कुटुंब प्रबोधन या गतिविधी व संघ द्वारा चाललेल्या इतर कार्याची माहिती दिली. संघांचे काम हे हिमनगा प्रमाणे आहे. जरी स्वयंसेवक ते कार्य करीत असताना दिसत असले तरी जनसामान्यांचे योगदान या कार्यात उल्लेखनीय असल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर यावेळी त्यांनी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या ३०० व्या जयंतीचे स्मरण करून त्यांच्या योगदानाबद्दल गौरवोद्गार काढले. तसेच भगवान बिरसा मुंडा आणि जनजातींचे बलिदानाचे स्मरण करून, त्यांच्या योगदानाचा विशेष उल्लेख केला. प्रमुख अतिथी प्रसन्न देशपांडे यांनी आपल्या संबोधनात पर्यावरणाच्या शाश्वत विकासावर भर दिला. त्यांनी भविष्यातील पिढ्यांच्या गरजा बाधित होणार नाहीत, हा विचार करून, पर्यावरण, समाज आणि अर्थव्यवस्थेच्या संतुलित प्रगतीसाठी संघाने पुढाकार घेण्याचे आवाहन केले. सण उत्सवाचे महत्त्व सांगताना ते म्हणाले की, देशातील विविध उत्सव आणि सण हे भारतीय संस्कृतीतील एकतेचे प्रतीक असल्याचे नमूद केले.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article