जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघात 14 ते 21 फेर्यांमध्ये मतमोजणी होणार आहे.
Published on
:
23 Nov 2024, 12:37 am
Updated on
:
23 Nov 2024, 12:37 am
सांगली : जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघात 14 ते 21 फेर्यांमध्ये मतमोजणी होणार आहे. प्रत्येक फेरीनिहाय निकाल जाहीर करण्यात येेणार आहे.
प्रत्येक मतदारसंघात ईव्हीएमवरील मतांची मोजणी सकाळी 8.30 वाजता सुरू होणार आहे. मतमोजणी केंद्रातील सर्व कार्यवाही सीसीटीव्हीद्वारे चित्रित करण्यात येणार आहे. विधानसभा मतदारसंघनिहाय नियुक्त मनुष्यबळ 20 टक्के राखीव ठेवण्यात आले आहे. मतमोजणीच्या फेर्या, टपाली मतमोजणीसाठी टेबल्स, इटीपीबीएस टेबल्स यांची संख्या पुढीलप्रमाणे आहे.
मिरज : नियुक्त मनुष्यबळ 144, मतमोजणीच्या फेर्या 16, ईव्हीएम मतमोजणीसाठी 20 टेबल्स, टपाली मतमोजणीसाठी 8 टेबल्स, इटीपीबीएससाठी 4 टेबल्स. सांगली : मनुष्यबळ 137, मतमोजणीच्या फेर्या 16, ईव्हीएम 20 टेबल्स, टपाली मतमोजणीसाठी 8 टेबल्स, इटीपीबीएससाठी 1 टेबल. इस्लामपूर : मनुष्यबळ 96, मतमोजणीच्या फेर्या 21, ईव्हीएम मतमोजणीसाठी 14 टेबल्स, टपाली मतमोजणीसाठी 4 टेबल्स, इटीपीबीएससाठी 4 टेबल्स.
शिराळा : मनुष्यबळ 154, मतमोजणीच्या फेर्या 17, ईव्हीएम मतमोजणीसाठी 20 टेबल्स, टपाली मतमोजणीसाठी 10 टेबल्स, इटीपीबीएससाठी 4 टेबल्स. पलूस-कडेगाव : मनुष्यबळ 106, मतमोजणीच्या फेर्या 21, ईव्हीएम मतमोजणीसाठी 14 टेबल्स, टपाल मतपत्रिकांच्या मतमोजणीसाठी 6 टेबल्स, इटीपीबीएससाठी 4 टेबल्स. खानापूर : मनुष्यबळ 134, मतमोजणीच्या फेर्या 18 , ईव्हीएम मतमोजणीसाठी 20 टेबल्स, टपाली मतमोजणीसाठी 6 टेबल्स, इटीपीबीएस साठी 4 टेबल्स. तासगाव-कवठेमहांकाळ : मनुष्यबळ 130, मतमोजणीच्या फेर्या 22, ईव्हीएम मतमोजणीसाठी 14 टेबल्स, टपाली मतमोजणीसाठी 11 टेबल्स, इटीपीबीएससाठी 4 टेबल्स.
जत : मनुष्यबळ 106, मतमोजणीच्या फेर्या 21, ईव्हीएम मतमोजणीसाठी 14 टेबल्स, टपाली मतमोजणीसाठी 6 टेबल्स, इटीपीबीएससाठी 4 टेबल्स. ईव्हीएमच्या मतमोजणीसाठी प्रत्येक टेबलसाठी एक पर्यवेक्षक, एक मतमोजणी सहायक व एक सूक्ष्म निरीक्षक, तसेच टपाली मतमोजणीसाठी प्रत्येक टेबलसाठी एक सहायक निवडणूक निर्णय अधिकारी, एक मतमोजणी पर्यवेक्षक, दोन मतमोजणी सहायक, एक सूक्ष्म निरीक्षक व एक शिपाई यांची, तर इटीपीबीएससाठी प्रत्येक टेबलसाठी एक पर्यवेक्षक, एक सहायक यांची नियुक्ती करण्यात आली आहे.