साकूर दरोडा - पाचही आरोपी जेरबंद:आरोपींकडून २० तोळे सोन्याचे दागिने हस्तगत; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई‎

3 days ago 2
संगमनेर तालुक्यातील साकूर येथील कान्हा ज्वेलर्स दरोड्यातील पाच आरोपींना जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले. आरोपीकडून १५.९५ लाख रुपयांचे २० तोळे सोने हस्तगत करण्यात आले आहे. ११ नोव्हेंबर रोजी ही घटना घडली होती. पथकाने दोन आरोपींचा पाठलाग करून शिक्री (ता.संगमनेर) येथील डोंगर परिसरातून त्यांना ताब्यात घेतले होते. पथकाने सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे मनोज साठे (रा.माळशिरस, जि.सोलापूर) याचा गुन्ह्यात सहभाग असल्याचे निष्पन्न केले होते. रविवारी आरोपी मनोज साठे याने चोरी केलेले सोने त्याचा साथीदार धोंड्या जाधव (रा.निघोज, ता.पारनेर) व सुनिल उर्फ निल चव्हाण (रा.गणेशपेठ पुणे) यांच्याकडे विक्रीकरीता दिल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पथकाने पुणे येथून सुनिल उर्फ निल विजय चव्हाण याला ताब्यात घेतले. त्याने सोन्याचे दागिने अभिषेक महेश तळेगावकर (रा.रविवार पेठ, पुणे) याला विक्रीसाठी दिल्याचे सांगितले. त्यानुसार पथकाने तळेगावकर याचा शोध घेतला. त्याने सोने सोमवार पेठ, पुणे येथील सोनाराकडे विकल्याची माहिती दिली. तपास पथकाने सोनाराकडून मुद्देमाल जप्त केला. दरम्यान, आरोपी मनोज साठे हा बेलवंडी फाटा येथे असल्याची माहिती मिळताच पथकाने बेलवंडी फाटा येथे सापळा रचून आरोपींना ताब्यात घेतले. दयावान उर्फ मनोज बाळासाहेब साठे याच्यासाह अजय उर्फ भोऱ्या उर्फ भोल्या बाळू देवकर (वय २२, रा.कौठेयमाई, ता.शिरूर, जि.पुणे), योगेश अंकुश कडाळे (वय २७, रा.धामणी, लोणी, ता.आंबेगाव, जि.पुणे), आकाश ठकाराम दंडवते (वय २८, रा.मलठण, ता.शिरूर, जि.पुणे) अशी त्यांची नावे आहेत. त्यांनी हा गुन्हा धोंड्या महादू जाधव (फरार) व मन्ना उर्फ सुरजसिंग उर्फ अजयसिंग, (रा.पंजाब (फरार) अशांनी केला असल्याची माहिती दिली. धोंड्या व्हॉट्सअॅप कॉलद्वारे घेत होता घटनेची माहिती आरोपी धोंडया प्रत्यक्ष घटना ठिकाणी न त्याने अजय देवकर, अक्षय वावरे, मन्ना, स्वप्नील येळे व मनोज साठे यांना दोन पल्सर मोटार सायकलवर साकुर येथे गुन्हा करण्यासाठी पाठविले व तो बाहेरून आरोपीकडून व्हॉटसअप कॉलद्वारे माहिती घेत होता. आरोपी हे पल्सर मोटार सायकलवर कान्हा ज्वेलर्स येथे आले. मन्ना याने दुकानादारास बंदुकीचा धाक दाखविला. स्वप्नील येळे हा दुकानाबाहेर होता. अक्षय देवकर व मनोज साठे याने दुकानातील सोन्याचे दागीने पिशवीत भरले. दुकानातून जाताना मन्ना व स्वप्निल येळे यांनी गावठी कट्ट्यातून प्रत्येकी १ राऊंड फायर केला. टाकळी ढोकेश्वर येथे आरोपी रस्ता चुकले गुन्हा केल्यानंतर आरोपी पळून जात असताना टाकळी ढोकेश्वर येथे रस्ता चुकले. त्याचवेळी पोलिस व नागरीक आरोपीचा पाठलाग करत असताना आरोपी हे पल्सर मोटार सायकल सोडून शिक्री येथील डोंगरामध्ये पळून गेले. आरोपीपैकी अक्षय बाळु देवकर, मनोज बाळासाहेब साठे व मन्ना उर्फ सुरजसिंग असे रात्रभर डोंगरामध्ये लपून सकाळच्या वेळी आळेफाटा ते नगर जाणारे हायवेला येऊन त्यांनी धोंडया जाधव यास मोबाईल करून हायवेला बोलावून घेतले. धोंडया स्वीफ्ट गाडीने येऊन आरोपींना मंचर येथे घेऊन गेला.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article