सागर बंगल्यावरील नेता बदलल्यानंतर नितेश राणेंना कोण वाचविणार?:आमदार रोहित पवार यांचा इशारा

6 days ago 3
आगामी दिड महिन्यात सागर बंगल्यावरील नेता बदलून त्या ठिकाणी महाविकास आघाडीचा नेता येणार आहे. त्यावेळी तुम्हाला कोण वाचविणार याचा विचार नितेश राणे यांनी करावा असा सल्ला वजा इशारा राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) आमदार रोहित पवार यांनी शुक्रवारी ता. ११ वसमत येथे पत्रकारांशी बोलतांना दिला आहे. वसमत येथे आयोजित युवा संवाद मेळाव्याच्या कार्यक्रमासाठी आमदार रोहित पवार, रोहित पाटील आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. तत्पुर्वी त्यांनी शहरातून दुचाकी रॅली काढली होती. यावेळी पत्रकारांशी बोलतांना पवार म्हणाले की, मागील पाच वर्षात नितेश राणे यांनी सागर बंगल्यातील नेत्याला खूष करण्यास घालवली. त्यांची सत्ता असतांना देखील त्यांना पद मिळाले नाही. पुढील दिड महिन्यात सागर बंगल्यात महाविकास आघाडीचा नेता बसणार आहे. त्यामुळे काही समाजाच्या विरोधात, महिलांच्या विरोधात वक्तव्य करणाऱ्या नितेश राणे यांना तेव्हा कोण वाचविणार याचा विचार त्यांनी केला पाहिजे. राज्य सरकारवर टिका करतांना ते म्हणाले की, सरकार निर्णयावर निर्णय घेत आहे, मात्र पुर्वी घेतलेल्या निर्णयाचे काय झाले यावर कोणीच बोलत नाहीत. नुकत्याच झालेल्या कॅबीनेटच्या बैाठकीत अडीच तास चर्चा झाली. राज्य सरकारचा भ्रष्टाचार सुरुच राहिला तर जानेवारी महिन्यात अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी पैसा राहणार नाही. सरकारने मागील अडीच वर्षात शेतकरी, कष्टकऱ्यांसाठी कोणत्याच चांगल्या् योजना आणल्या नाही उलट आता जनतेचाच पैसा जनतेत वाटण्याचे काम सरकार करीत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. आगामी विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्री कोण राहिल यावर बोलतांना पवार म्हणाले की, राज्यातील जनतेचा विचार करणारा महाविकास आघाडीचा मु्ख्यमंत्री असेल. मात्र मुख्ममंत्री कोण असणार हे काँग्रेसचे नेते राहुल गांधी, राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, शिवसेनेचे पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे हेच ठरवितील. त्यामुळे कोणी कितीही मत व्यक्त केले तरी नेतेच निर्णय घेत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article