सैफवर हल्ला करणारा सीसीटीव्हीत कैद झालेला आरोपी मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजाद. दुसर्या छायाचित्रात सैफ अली खान संग्रहित छायाचित्र. File Photo
Published on
:
22 Jan 2025, 3:52 am
Updated on
:
22 Jan 2025, 3:52 am
पुढारी ऑनलाईन डेस्क : अभिनेता सैफ अली खान याच्यावर झालेल्या जीवघेणा हल्ला करणारा बांगलादेशी नागरिक आरोपी मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजाद याला पोलिसांनी अटक केली आहे. मंगळवारी (दि.२१) रात्री मुंबई पोलिसांनी सैफच्या घरी जावून हल्ल्याचा सीन रिक्रिएट केला. सुक्युरिटी गार्ड (सुरक्षा रक्षक) झोपले होते. याचा फायदा घेत हल्लेखाेराने भिंतीवरून उडी मारून सैफ अली खान राहात असलेल्या इमारतीत प्रवेश केला. यानंतर जिन्यातून त्याच्या फ्लॅटमध्ये शिरला, अशी माहिती पोलीस तपाासात समोर आल्यावे वृत्त 'पीटीआय'ने दिले आहे.
सुरक्षा रक्षक झोपले होते...
सैफ अली खानवर हल्ला कसा झाला? याबाबत माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या आरोपीने भिंतीवरून उडी मारून अभिनेत्याच्या इमारतीत प्रवेश केला होता. हल्लेखोर जेव्हा भिंतीवरून आत शिरला तेव्हा अभिनेता सैफ अली खान ज्या इमारतीत राहतो त्या इमारतीचे दोन्ही सुक्युरिटी गार्ड झोपले होते. दोन्ही सुरक्षा रक्षकांना गाढ झोपलेले पाहिले तेव्हा आरोपी मुख्य गेटमधून इमारतीत शिरला, तिथे सीसीटीव्ही कॅमेराही बसवलेला नव्हता. कोणत्याही प्रकारचा आवाज टाळण्यासाठी, आरोपीने त्याचे बूट काढले.
कॉरिडॉरमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा नव्हते!
तपासादरम्यान पोलिसांना इमारतीच्या कॉरिडॉरमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा बसवलेला नसल्याचे आढळून आले. त्याच वेळी, त्यांच्या तपासात असेही आढळून आले की दोन सुरक्षा रक्षकांपैकी एक केबिनमध्ये आणि दुसरा गेटवर झोपला होता. सैफच्या घराव्यतिरिक्त, आरोपीला परिसरात फिरवून त्याने गुन्हा कसा केला याची माहिती पोलिसांनी घेतली.
तपास अजय लिंगनूरकर यांच्याकडे
अभिनेता सैफ अली खान चाकूहल्ल्याच्या घटनेचे प्रारंभिक तपास पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड यांच्याकडे होता. आता तो अजय लिंगनूरकर यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. दरम्यान, मंगळवारी (दि. २२) सैफ अली खानला लीलावती रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. चाकू हल्ल्याच्या घटनेच्या जवळपास पाच दिवसांनंतर, अभिनेत्याला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. अभिनेत्याची प्रकृती सुधारत आहे.