सोलापूर : करमाळ्यातील तेजस वीर याने पटकावले रौप्यपदक

3 hours ago 1
पुढारी वृत्तसेवा

Published on

04 Oct 2024, 5:50 pm

Updated on

04 Oct 2024, 5:50 pm

करमाळा : तालुक्यातील देवळाली येथील संगणक अभियंता तेजस सुंदरदास वीर याने सॅन अँटोनियो, टेक्सास, अमेरिका येथे नुकत्याच झालेल्या मेन्स जागतिक ओपन रॅकेटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत रौप्यपदक पटकाविले आहे.

यापूर्वी वीर याने 2022 व 2023 मध्येही ब्राँझ मेडल मिळविले होते. या स्पर्धेमध्ये 12 देशांतील स्पर्धकांनी भाग घेतला होता. तेजस यांनी या खेळाचे प्रशिक्षण अमेरिकेत घेतलेले आहे. परंतु, स्पर्धेत उतरताना भारतीय संघातून सहभाग घेत आहे. तेजस हा गेल्या पाच वर्षांपासून या खेळात आहे. तो सध्या शिकागो, अमेरिका येथे नोकरीच्या निमित्ताने वास्तव्यास आहेत. त्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article