हजारो भाविकांनी घेतला चटणी अन् पुरीचा महाप्रसाद:परमानंद नारायण सरस्वती स्वामी यांचा 114 वा संजीवन समाधी सोहळा‎

2 hours ago 2
साखरखेर्डा श्री क्षेत्र रानअंत्री ता. चिखली येथे सद्गुरु परमानंद नारायण सरस्वती स्वामी महाराज यांच्या ११४व्या संजीवन समाधी सोहळ्याला भागवताचार्य रामायणाचार्य आनंदमूर्ती रामदास महाराज यांच्या अध्यक्षतेखाली दि २६ नोव्हेंबरपासून प्रारंभ झाला झाला असून. दि २८ नोव्हेंबर रोजी ५५ क्विंटल चटणी आणि १८ क्विंटल पुरीचा महाप्रसादाचे वितरण ठाणेदार गजानन करेवाड यांच्या हस्ते करण्यात आले . रानअंत्री येथे दरवर्षी यात्रा महोत्सवाचे आयोजन करण्यात येते ११२ वर्षाची या चटणी-पुरी महाप्रसादाची परंपरा आजही कायम आहे. मंगळवार दि. २६ नोव्हेंबर रोजी प्रताप महाराज इंगळे, चंदनपूर यांचे दु १ ते २ प्रवचन, . रामदास महाराज वाघ, आमखेड ता. देऊळगावराजा यांचे रात्री ८ ते ११ कीर्तन, बुधवार दि. २७ नोव्हेंबर रोजी सकाळी 'श्रीं' चा अभिषेक व महापूजा मधुकरराव सावळे, गांगलगाव, केशवराव रुपराव बंगाळे, शिंदी यांच्या हस्ते श्री गुरु शिवस्वरुप सच्चिदानंद महाराज बर्डी जालना यांचे दुपारी १ ते २ प्रवचन झाले. ठाणेदार गजानन करेवाड पोलिस स्टेशन साखरखेर्डा, यांच्या हस्ते विजयानंद बुन्हाडे (भगवान परमानंद नारायण सरस्वती चरण सेवा मंडळ, नाशिक) यांच्या उपस्थितीत बुधवार, दि. २७ नोव्हेंबर रोजी दुपारी २ ते ५ वा. महाप्रसाद वितरण करण्यात करण्यात आले. तर रात्री 'श्रीं' ची पालखी मिरवणूक व श्री. शालीकराम महाराज देशमुख मोहगाव यांचा भारुडाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.तर गुरुवारी सकाळी ९ वा. डॉ अनिरुद्ध महाराज क्षीरसागर माळसावरगांव यांचे काल्याचे कीर्तन संपन्न झाले. पुरीसोबत चटणीच का? ^शंभर वर्षांपूर्वी येथे महाराजांच्या दर्शनासाठी परप्रांतातून भाविक येथे यायचे तेव्हा त्यांना घरी पोहोचायला दीर्घ काळ लागायचा तेव्हा महाराजांचा प्रसाद शिळा व्हायचा त्यामुळे भाविकांना घरी गेल्यावर प्रसाद घेता यावा म्हणून चटणी आणि पुरीच्या महाप्रसादाची परंपरा सुरू करण्यात आली . - गजानन झाल्टे गुरुजी विश्वस्त, रानअंत्री महाप्रसादाचे वितरण करताना ठाणेदार गजानन करेवाड.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article