हिंगोली जिल्ह्यात उमेदवारांच्या विजयाचे गणित तरुणाईच्या हातात:9.74 लाख पैकी 4.69 लाख तरुण मतदार, 3.15 हजार मतदार पंन्नाशीच्या पुढचे

1 day ago 2
हिंगोली जिल्ह्यात तीनही विधानसभा मतदार संघात उमेदवारांच्या विजयाचे गणित तरुणाईच्या हातात आहेत. जिल्ह्यातील 9.74लाख मतदारां पैकी 4.69 लाख मतदार चाळीसी पर्यंतचा आहे. तर 40 ते 50 वर्ष वयोगटातील 1.89 लाख मतदार आहेत. त्यामुळे उमेदवारांना आता तरुणांना सोबत घेऊनच प्रचार करावा लागणार असल्याचे स्पष्ट होत आहे. हिंगोली जिल्ह्यात हिंगोली, वसमत व कळमनुरी विधानसभा मतदार संघ आहेत. या मतदार संघातून राजकिय पक्षांकडून मागील दोन ते तीन महिन्यापासून इच्छूक उमेदवारांचा प्रचार सुरु असून उमेदवारी पुर्वीच आरोप प्रत्यारोपाने मतदार संघ गाजू लागले आहेत. या शिवाय विद्यमान आमदारांनीही अचारसंहितेच्या धसक्याने मागील एक महिन्यात विकास कामांच्या भुमीपूजनाचा धडका सुरु केला होता. आता आदर्श अचारसंहिता जाहिर झाल्याने कामांचे भुमीपूजन झाले असले तरी सर्व कामे अचारसंहितेनंतरच सुरु होणार आहेत. निवडणुकीत तीनही विधानसभा मतदार संघातून एकूण 9 लाख 74541 मतदार आहेत. या मतदारांमध्ये 18 ते 19 वर्ष वयोगटातील नवमतदारांची संख्या 22956 आहे. तर 20 ते 29 वर्ष वयोगटातील मतदारांची संख्या 2.20 लाख आहे तर 30 ते 39 वर्षवयोगटातील मतदारांची संख्या 2.25 लाख एवढी आहे. ्जिल्ह्यातील एकूण मतदारांचा विचार करता उमेदवारांच्या विजयाचे गणित तरुणाईच्याच हातात असणार आहे. या शिवाय त्यासाठी 40 ते 49 वर्षवयोगटातील 1.89 लाख मतदारांचा हातभार असणार आहे. निवडणुकीत विजयसोपा करण्यासाठी उमेदवारांना तरुणाईला साद घालावी लागणार असल्याचे चित्र दिसू लागले आहे. तर ज्यांच्याकडे तरुणाईचा कल त्याच्याच गळ्यात विजयाची माळ असे समीकरण होण्याची चिन्हे दिसू लागली आहे. जिल्ह्यात 50 ते 59 वर्ष वयोगटातील मतदारांची संख्या 1.45 लाख असून 60 ते 69 वयोगटातील मतदारांची संख्या 91121 आहे. 70 ते 79 वर्ष वयोगटातील मतदारांची संख्या 50129 असून 80 वर्ष वयोगटापेक्षा जास्त वय असलेल्या मतदारांची संख्या 22891 एवढी आहे. या सर्व मतदारांची एकूण संख्या 3.15 लाख एवढी आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article