हिंगोली जिल्ह्यात रोहित्र वाटपात मोठा गैरव्यवहार:शेतकऱ्यांचे विज कंपनीकडे निवेदन

1 day ago 1
हिंगोली जिल्ह्यात रोहित्र वाटपात मोठा गैरव्यवहार झाला असून काही रोहित्र परस्परच शेतकऱ्यांना विक्री करण्यात आल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. या संदर्भात विज कंपनीकडे गुरुवारी निवेदन सादर केले असून नेमके कुठल्या रोहित्रात गैरव्यवहार झाला] याची यादीच प्रशासनाकडे सादर केली आहे. हिंगोली जिल्ह्यात विज कंपनीचा कारभार मागील काही दिवसांपासून चांगलाच गाजत आहे. शेती पंपाना योग्य दाबाने विज पुरवठा द्यावा, विज वाहिन्या, किटकॅट दुरुस्ती करावी यासह इतर मागण्यांसाठी डॉ. रमेश शिंदे हे मागील चार दिवसापासून उपोषणाला बसले आहेत. मात्र या उपोषणाची विज कंपनीकडून कोणत्याही प्रकारची दखल घेण्यात आली नाही. त्यानंतर आज डॉ. शिंदे यांच्यासह डॉ. प्रल्हाद शिंदे, दाजीबा पाटील, दिलीप थोरात, विश्‍वनाथ फाळके, राजेश टेकाळे, राजाराम शिंदे, कैलास टेकाळे, सखाराम शिंदे यांच्यासह शेतकऱ्यांनी विज कंपनीकडे निवेदन दिले आहे. यामध्ये हिंगोली जिल्ह्यात पुसेगाव, डोंगरकडा, येळी, नर्सी, नागासिंगी, गिरगाव, जलालदाभा, महागाव, देवकरवाडी, कनका, भिर्डा, मसोड, संतुकपिंपरी, पुरजळ, हिर्डी, बागल पार्डी, कडपदेव, आडगावक, वसमत, आरळ, कवठा, उटी, नवलगव्हाण, बेलतुरा, दांडेगाव, साखरा, भगवती या या ठिकाणी प्रत्यक्षात 63 केव्हीए क्षमतेचे रोहित्र दुरुस्तीसाठी आणण्यात आल्यानंतर सर्वच ठिकाणी आर्थिक व्यवहार करून वाढीव क्षमतेचे रोहित्र दिली, तर काही रोहित्र परस्पर शेतकऱ्यांना विक्री केल्याचा आरोप निवेदनाद्वारे करण्यात आला आहे. या शिवाय विज कंपनीकडून दरवर्षी विज वाहिन्या, किटकॅट यासह इतर साहित्याची दुरुस्ती करणे अपेक्षित असतांना मागील तीन ते चार वर्षापासून दुरुस्तीच करण्यात आली नाही तर दुरुस्तीची देयके उचलले गेल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. या प्रकाराची चौकशी करण्याची मागणी या निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनावरून चौकशी केली जाईल संबंधित शेतकऱ्यांनी दिलेले निवेदन अद्यापपर्यंत आपल्यापर्यंत आले नाही. मात्र त्यांनी दिलेल्या निवेदनानुसार चौकशी करून योग्य ती कारवाई केली जाईल, असे विज कंपनीचे अधीक्षक अभियंता आर. एम. चव्हाण यांनी सांगितले.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article