हुतात्मा-उद्यानला जेऊर,माढा येथे थांबा द्यावा सोलापूर दौंड डेमूचा विस्तार करा:प्रवासी संघटनेचे सोलापूर विभागाच्या व्यवस्थापकांना निवेदन

1 hour ago 2
हुतात्मा व उद्यान एक्स्प्रेसला माढा व जेऊर येथे थांबा द्यावा, सोलापूर ते दौंड डेमू रेल्वे हडपसरपर्यंत विस्तारीत करत वाशिंबे येथे थांबा देण्याच्या मागणीचे निवेदन सोलापूर प्रवासी सेवा संघ आणि जेऊर प्रवासी संघटनेच्या वतीने सोलापूर रेल्वे विभागाचे व्यवस्थापक नीरजकुमार दोहरे यांना देण्यात आले. सोलापूर रेल्वे विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक दोहरे व इतर विविध विभागामधील वरिष्ठ अधिकारी दौंड ते कुर्डूवाडी पाहणी दौऱ्यासाठी आले होते. तेव्हा प्रवासी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदन देऊन आपल्या मागण्या मांडल्या. प्रवासी संघटनेने दिलेल्या निवदेनात म्हटले आहे की माढा व जेऊर येथे हुतात्मा व उद्यान एक्सप्रेस ला थांबा द्यावा.सोलापूर ते दौंड डेमू हडपसर पर्यंत विस्तारीत करुन वाशिंबे येथे प्रवासी थांबा द्यावा.तसेच दिवाळी स्पेशल म्हणून सुरू केलेली दौंड कलबुर्गी शटल पूर्ववत करुन वाशिंबे येथे थांबा देऊन ही गाडी कायमस्वरूपी चालवावी,जेऊर येथे पार्सल बुकींग सेवा सुरू करुन प्लॅटफॉर्म एक वरील शेडची लांबी वाढवावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. यावेळी सदर निवेदनातील मागण्याबाबत रेल्वे प्रशासन मुंबई व रेल्वे मंत्रालय नवी दिल्ली येथील वरीष्ठ कार्यालयाकडे पाठपुरावा करण्यात येत असल्याचे रेल्वे प्रशासनाने सुचीत केले.प्रवासी सेवा संघाने केलेल्या मागण्याबाबत रेल्वे प्रशासन सकारात्मक दृष्टीने कार्यवाही करीत असून मागण्यांची पुर्तता करून प्रवाश्यांना चांगली प्रवासी देण्याचे प्रयत्न रेल्वे विभागाकडून केले जात आहेत असे रेल्वे प्रशासनाने आश्वासन दिल्याचे प्रवासी सेवा संघाचे अध्यक्ष संजय पाटील यांनी सांगितले.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article