12 नगरसेवकांचा ठाकरेंना "जय महाराष्ट्र'; मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदेसेनेत:अहिल्यानगर ठाकरे गटातील नाराज शिवसैनिकांनी अखेर धनुष्य उचलले‎

2 hours ago 1
काही दिवसांपूर्वीच शिवसेनेच्या ठाकरे गटातून तिघे नगरसेवक शिंदे गटात गेल्यानंतर आता तब्बल १२ विद्यमान नगरसेवकांसह शहरप्रमुख, काही माजी नगरसेवक व पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी ठाकरे सेनेला जय महाराष्ट्र करत गुरुवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मुंबई येथे शिवसेनेत (शिंदे गट) प्रवेश केला आहे. त्यामुळे शहरात ठाकरे गटाला मोठे खिंडार पडले आहे. आत्तापर्यंत २३ पैकी १७ नगरसेवकांनी ठाकरे गट सोडून शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्यामुळे ठाकरे गटात केवळ सहाच नगरसेवक राहिले आहेत. विधानसभा निवडणुकीत अहिल्यानगर शहर विधानसभेची हक्काची जागा सोडल्याने ठाकरे गटात मोठी अस्वस्थता पसरली होती. निवडणुकीत तीन-चार वगळता उर्वरित नगरसेवक प्रचारापासून लांबच होते. मुंबईत पक्ष नेतृत्वाला भेटण्यासाठी गेलेले असताना भेट नाकारणे, नाराजीची दखल न घेतल्याने नगरसेवक व शहरातील पदाधिकारी नाराज होते. त्यात राज्यात महायुतीची सत्ता आल्यामुळे आगामी महानगरपालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून या नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. जिल्हाप्रमुख अनिल शिंदे, शहरप्रमुख सचिन जाधव यांच्या नेतृत्वाखाली नगरसेवक, कार्यकर्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून सकाळीच मुंबईकडे रवाना झाले. मुंबईत उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या बंगल्यावर रात्री उशिरा प्रवेश केला. प्रवेश केलेले पदाधिकारी माजी नगरसेवक : सुरेश तिवारी, उपशहरप्रमुख : संदीप दातरंगे, अरुण झेंडे, अभिजित अष्टेकर, प्रताप गडाख, घनश्याम घोलप, ईश्वर शेळके, विभागप्रमुख : गणेश झिंजे, सागर थोरात, प्रणव भोसले, राहुल कवडे, अंकुश साबळे, शाखा प्रमुख : दिपक आडेप, सुशांत म्हस्के, कैलास शिंदे, सुनील सुडके, संतोष तनपुरे, प्रवीण बेद्रे, अभिजित दहिंडे, रामा गुंडू, सुशांत शिंदे, चेतन शिरसुल, कार्यालय प्रमुख : रमेश खेडकर मयूर मेहता | अहिल्यानगर विधानसभा निवडणुकीत नगरची जागा सोडल्याने नाराज झालेल्या नगरसेवक व पदाधिकाऱ्यांची पक्षाकडून दखल घेतली न गेल्याने संतप्त नगरसेवकांनी अखेर शिंदे गटाची वाट धरली. पक्ष नेतृत्वावर नाराजीसह आगामी महानगरपालिका निवडणुकीत महायुतीची उमेदवारी हेही या पक्ष बदलाचे प्रमुख कारण आहे. शहरात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप हे महायुतीचे आमदार आहेत. मनपासह शहरावरही त्यांची मजबूत पकड आहे. राज्यात महायुतीची सत्ता असल्याने मनपा निवडणुकीत शहरातही महायुतीला वातावरण चांगले असणार आहे. त्यात नगरविकास खाते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे. त्यामुळे आत्ताच शिंदे गटात म्हणजे महायुतीत गेल्यास आगामी मनपा निवडणुकीपूर्वी राज्यातील सत्तेच्या माध्यमातून प्रभागात विकासासाठी मोठा निधी उपलब्ध होईल व महायुतीची उमेदवारी असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपचीही साथ मिळणार आहे. त्यामुळे महायुतीत व तेही शिंदे गटात जाण्याचा निर्णय या नगरसेवकांनी घेतला आहे. . गुरुवारी शिंदे गटात गेलेले नगरसेवक : शहरप्रमुख संभाजी कदम, बाळासाहेब बोराटे, गणेश कवडे, दत्ता कावरे, परेश लोखंडे, संजय शेंडगे, सचिन शिंदे, शाम नळकांडे, संग्राम कोतकर, बबलू शिंदे, विजय पठारे, संतोष गेनाप्पा • यापूर्वी ठाकरेंना सोडून शिंदे गटात गेलेले नगरसेवक : अनिल शिंदे, सुभाष लोंढे, दत्ता जाधव, प्रशांत गायकवाड, दीपक खैरे • अद्यापही ठाकरे गटात असलेले नगरसेवक : योगीराज गाडे, अनिल बोरुडे, अमोल येवले, अशोक बडे, रीता भाकरे, कमल सप्रे

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article