राज्य संपवण्यासाठी दिल्लीतून प्रयत्न सुरू:मराठीचे अस्तित्व वाचविण्यासाठी सर्व पक्षांनी भूमिका घ्यावी- संजय राऊत
3 hours ago
1
बाळासाहेब ठाकरे, शरद पवार यांचे कालखंड वेगळा होता. आतचा काळ वेगळा आहे हे राज्य संपवण्यासाठी दिल्लीतून प्रयत्न सुरू आहेत. आज बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना तोडायची, ठाकरे नावाचे वलय संपवायचे प्रयत्न केले जात आहे. या नावाविरोधात केंद्र अन् राज्य सरकार उभे आहे, यावेळी भूमिका बदलून चालणार नाही, आधी राज्य वाचवले पाहिजे असे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. दरम्यान संजय राऊत पुढे बोलताना म्हणाले की, महाराष्ट्र आणि मराठी माणसांचे अस्तित्व वाचवण्याची भूमिका महाराष्ट्रावर प्रेम करणाऱ्या सर्वच पक्षांनी घेणं गरजेचे आहे. मग ते नेते भाजपमधील असो शिंदे गटातील असो की अजित पवारांच्या गटातील पण महाराष्ट्राच्या पलीकडे राजकारण नाही हे लक्षात घेतले पाहिजे. EVMच्या मुद्यावर आमचा पाठिंबा संजय राऊत म्हणाले की, राज ठाकरेंनी जी भूमिका मांडली आहे, त्याला विरोध करण्यासारखे काहीच नाही. त्यांनी जे मुद्दे मांडले आहेत त्यांना विरोध करण्यासारखे काहीच नाही. राज्यात विरोधासाठी विरोध ही जी पद्धत सुरू झाली आहे त्यातून आपण बाहेर पडले पाहिजे. त्यांनी मांडलेल्या EVMच्या मुद्यावर आमचा पाठिंबा आहे. पण त्यामुळे राजकीय भूमिका बदलते का तर नाही. राज ठाकरेंची भविष्यात काय भूमिका राहणार यासाठी थोडावेळ थांबावे लागेल. फडणवीसांना मन असेल तर समजेल संजय राऊत म्हणाले की, युतीच्या चर्चाबद्दल देवेंद्र फडणवीस यांचे वक्तव्य अगदी बरोबर आहे. अशा सोहळ्यांमध्ये राजकीय चर्चा होत नाही. पण जेव्हा नेते आपली भावना मांडतात तेव्हा ते त्यांचे मन असते. चंद्रकांत पाटील यांचे आणि उद्धव ठाकरेंचे बोलणं झाले आणि ते निघून गेले. मनातील भावना देवेंद्र फडणवीसांना मन असेल तर त्यांनी समजून घेतले पाहिजे. ..त्यांची इतिहासात नोंद होत नाही संजय राऊत म्हणाले की, संकट काळात जे पळून जातात त्यांची इतिहासात नोंद राहत नाही. कालच राज ठाकरे यांनी जी भूमिका मांडली आहे की मते कुठे गेली ते समजत नाही, तसेच माणसं त्यांच्याकडे जात आहे, हे देखील रहस्य आहे. जे आईला सोडून जातात त्यांनी गंगेत कितीही डुबक्या मारल्या तरी त्यांचे पाप धुतल्या जात नाही असा टोलाही राऊत यांनी लगावला आहे. जायचे त्यांनी जा असे ठाकरे म्हणाले नाही संजय राऊत म्हणाले की, उद्धव ठाकरे ज्यांना जायचे आहे त्यांनी जा असे कधीच म्हटले नाही. मी त्या अनेक बैठकांमध्ये असतो. कार्यकर्ते पदाधिकारी गेल्याचे दु:ख होत असते, पण जाणाऱ्यांनी ठाकरे कुटुंबीयांनी आपल्याला काय दिले आहे हे लक्षात घेतले पाहिजे. जाणाऱ्यांची प्रत्येकाची कारणे वेगळी आहेत. जे जाताय त्यांच्यासाठी शिवसेनेने काय केले नाही असा सवाल राऊतांनी उपस्थित केला.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)