परभणी (Parbhani) :- तालुक्यातील पिंगळी शेत शिवारात सुरू असलेल्या तिर्रट जुगारावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकला. या कारवाईत जुगार्यांजवळून रोख रक्कम, जुगाराचे साहित्य, वाहने मिळून २ लाख ८५ हजार ४१० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदर प्रकरणी २८ जानेवारीला ताडकळस पोलीस ठाण्यात गुन्हा (Crime) दाखल करण्यात आला आहे.
रोख रक्कम, जुगाराचे साहित्य, वाहने मिळून २ लाख ८५ हजार ४१० रुपयांचा मुद्देमाल जप्त
पोलीस अंमलदार गजानन क्षिरसागर यांच्या तक्रारीवरुन वैजनाथ गरुड, शेख अशफाक, डिगांबर गरुड, भारत गरुड, रामेश्वर गरुड, किशनराव कदम यांच्यावर गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. पिंगळी शेत शिवारात बाभळीच्या झाडाखाली काही इसम गोलाकार पध्दतीने बसून तिर्रट नावाचा जुगार खेळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. सदर माहिती वरुन छापा टाकत कारवाई करण्यात आली. तपास पोह. वर्हाडे करत आहेत.