भोजन, निर्वाह भत्ता नाही; ४ महिन्यांपासून विद्यार्थ्यांची उपासमार: विजय वडेट्टीवार

2 hours ago 2
पुढारी वृत्तसेवा

Published on

31 Jan 2025, 10:33 am

Updated on

31 Jan 2025, 10:33 am

नागपूर, पुढारी वृत्तसेवा: गेल्या ४ महिन्यांपासून ओबीसी वसतिगृहातील विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना सरकारकडून भोजन आणि निर्वाह भत्ता नाही, असा आरोप काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी केला आहे. महायुती सरकारच्या ओबीसीविरोधी धोरणामुळे गावखेड्यातून शहरात उच्चशिक्षणासाठी आलेल्या विद्यार्थ्यांची उपासमार होऊ लागली आहे. विद्यार्थ्यांकडे दुर्लक्ष करणाऱ्या सरकारने कर्मचारी पुरवठा करणाऱ्या कंपनीचे हित मात्र जोपासले. दोन टप्प्यांत २ कोटी ३४ लाख १६ हजार ३०१ रुपये इतका निधी या कंपनीला सरकारने दिला, असा आरोपही वडेट्टीवार यांनी केला आहे. (Maharashtra Politics News)

राज्यातील इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक जिल्हास्थळी दोन याप्रमाणे ७२ वसतिगृह सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर गाजावाजा करीत नागपुरात काही वसतिगृहांचे उद्‌घाटन केले. अजूनही या वसतिगृहांत शंभर टक्के प्रवेश होऊ शकलेले नाहीत. मुळात भाड्याने इमारती असल्याने या वसतिगृहांमध्ये भोजनाची सोय नाही. यासाठी विद्यार्थ्यांना दर महिन्याला ४ हजार ५०० रुपये दिले जातात. यासोबतच विद्यार्थ्यांना ६०० तर विद्यार्थिनींना ८०० रुपये निर्वाह भत्ता दिला जातो. यानुसार विद्यार्थ्यांना ५ हजार १०० तर विद्यार्थिनींना ५ हजार ३००रुपये देणे अपेक्षित आहे. मात्र, मागील चार महिन्यांपासून वसतिगृहातील विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना भोजन आणि निर्वाह भत्ता देण्यात आला नाही.

याविरोधात विद्यार्थ्यांनी आवाज उठविल्यानंतर ६ जानेवारीला १० लाख तर २० जानेवारी रोजी पाच लाख रुपयांचा निधी जाहीर करण्यात आला. मुळात महिन्याला साधारणत: दोन कोटी रुपयांप्रमाणे चार महिन्यांसाठी आठ कोटी रुपयांची गरज असतानाही केवळ १५ लाख रुपये देण्यात आले आहेत. इतक्या तुटपुंज्या रकमेत किती विद्यार्थ्यांना लाभ मिळणार हा खरा प्रश्न आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article