मूर्तिजापूर (Murtijapur Crime) : शहरातील मुख्य मार्गावर असलेल्या एचडीएफसी बँकेसमोर राहत असलेल्या युवकाने त्याची बुलेट दुचाकी १२ नोव्हेंबरच्या रात्री लॉक लावून घरासमोर उभी केली होती. अज्ञात भामट्याने लॉक तोंडून गाडी घेऊन पसार झाल्याची तक्रार दाखल झाल्यावर पोलिसांनी तपास चक्रे फिरविली असता मिळालेला गुप्त माहितीवरुन पसार आरोपीस घटनेच्या दोन महिन्यांनंतर मुद्देमालासह त्यास अटक करून गजाआड केले. यामुळे आणखी (Murtijapur Crime) चोरीच्या गाड्यांचा शोध लागण्याची शक्यता वर्तविली आहे.
राम मोहन कांबे (२७) रा. एचडीएफसी बँकेसमोर मेन रोड, मूर्तिजापूर याने दिलेली फिर्यादीनुसार १२ नोव्हेंबर रोजी नुकतीच नवीन घेतलेली बुलेट गाडी क्रमांक एमएच३० बीव्ही ८५९२ (किंमत १ लाख ५० हजार) घरासमोर हॅण्डल लॉक लावून उभी केली होती. सकाळी पाहिले असता गाडी घरासमोर दिसली नाही. याबाबत मित्र मंडळींना विचारपूस केली असता काहीच शोध लागला नसल्यानें (Murtijapur Crime) सिटी पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली.
सदर प्रकरणी ३०३ (२) बीएनएस नुसार गुन्हा दाखल करून तपास चक्रे फिरवित पोलिस निरीक्षक अजित जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक आशिष शिंदे, हेपोकॉ सुरेश पांडे, सचिन दुबे, मंगेश विल्हेकर, गजानन खेडकर यांनी पसार आरोपीच्या मिळालेला सुगाव्यावरुन मंगरूळपिर तालुक्यातील पारवा येथे २८ जानेवारीला सापळा रचला.
यावेळी आरोपी राजू रामकृष्ण मैधने (३८) यास विचारपूस केली असता उडवाउडवीची उत्तर दिली. त्यास पोलिसी हिसका दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली देत गाडीसुद्धा जप्त करण्यात आली. अटक करण्यात आलेल्या आरोपी सोबत असलेले दोन विधीसंघर्षीसह तीन अद्यापही पसार असून तेही लवकरच पोलिसांच्या जाळ्यात अडकणार आहेत. पुढील (Murtijapur Crime) तपास ठाणेदार अजित जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली हेड पोलिस कॉन्स्टेबल अनिल राठोड करीत आहेत. (श.प्र.)