हवाई क्षेत्रात भारताची मोठी उड्डाण:2047 पर्यंत 200 विमानतळ, 2026 मध्ये हवाई टॅक्सी सेवा सुरू होणार
2 hours ago
1
भारताच्या हवाई क्षेत्रात नवा इतिहास रचला जात आहे. केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री राममोहन नायडू यांनी सांगितले की, पूर्णपणे भारतीय बनावटीची प्रादेशिक हवाई वाहतूक सुरू करण्यासाठी मंत्रालय प्रयत्नशील आहे. सध्या विमान उत्पादनात देशाचा ३० ते ३५ टक्के वाटा असून, तो वाढवण्यासाठी पुढील पाच वर्षांचा विशेष आराखडा तयार करण्यात आला आहे. एरोनॉटिकल सोसायटी ऑफ इंडियाच्या दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेत बोलताना नायडू म्हणाले की, भारतातील हवाई वाहतूक क्षेत्र जगात सर्वाधिक वेगाने विकसित होत असून, दरवर्षी १० ते १२ टक्क्यांनी विमान प्रवाशांची संख्या वाढत आहे. गेल्या दहा वर्षांत विमानतळांची संख्या दुप्पट झाली असून, पुढील पाच वर्षांत आणखी ५० नवीन विमानतळे आणि २०४७ पर्यंत एकूण २०० विमानतळे विकसित केली जाणार आहेत. मोठ्या शहरांतील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी २०२६ मध्ये हवाई टॅक्सी सेवेची प्रायोगिक चाचणी होणार आहे. नवी मुंबई आणि नोएडा विमानतळांचे काम अंतिम टप्प्यात आहे. भारतीय हवाई क्षेत्रात महिला पायलटांचे प्रमाण २५ टक्क्यांपर्यंत नेण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. आर्टिफिशिअल इंटेलिजन्सच्या मदतीने हवाई वाहतूक अधिक सुरळीत करण्यावर भर दिला जाणार आहे. 'विकसित भारतासाठी एरोस्पेस क्षेत्रातील आव्हाने' या विषयावर आयोजित या परिषदेला इस्रोचे अध्यक्ष डॉ. एस. सोमनाथ, डीआरडीओचे अध्यक्ष डॉ. सतीश रेड्डी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)