Gram Panchayat: ग्रा.पं. इमारत बांधकामासाठी शाळेची भिंत पाडली

3 hours ago 1

महिला सरपंच पतीचा प्रताप
परभणीच्या जिंतूर तालुक्यातील संक्राळा येथील घटना

परभणी/ जिंतूर (Gram Panchayat) : नवीन ग्रामपंचायत ईमारतीच्या बांधकामासाठी विनापरवाना शाळेची संरक्षण भिंत पाडण्याचा प्रताप तालुक्यातील संक्राळा ग्रामपंचायतीच्या पतीने केला आहे. या प्रकाराचा ग्रामस्थांतून तिव्र निषेध करण्यात येत आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, जिंतूर तालुक्यातील संक्राळा येथे ग्रामपंचायतीच्या नवीन इमारतीचे बांधकाम करण्यात येत आहे. सदर (Gram Panchayat) इमारतीचे बांधकाम करण्यासाठी महिला सरपंच अर्चना पवन जाधव यांनी गायरानाीतल ५० बाय ६० अशी जमिन नमुना नं. ८ ची नक्कल ईस्टीमेट वर दिली होती. परंतू त्यांनी चुकीने ग्रामपंचायत इमारतीचे बांधकाम प्राथमिक शाळेच्या बाजूला केले होते. त्यानुसार सरपंच पती पवन जाधव यांनी शाळेची संरक्षण भिंत पाडली.

भिंत पाडण्यासाठी कोणतीही परवानगी घेतली नाही. याबाबत ग्रामस्थांत संताप व्यक्त करण्यात येत होता. तक्रारी आल्यानंतर (Gram Panchayat) जिंतूर पंचायत समितीचे विस्तार अधिकारी एस.व्ही.ढोणे, गटशिक्षणाधिकारी डी.एस. पोले यांनी पंचनामा करुन गटविकास अधिकारी यांना अहवाल सादर केला आहे. आता जि.प. शिक्षण विभाग संबंधित प्रकरणात काय कारवाई करते याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.

संक्राळा ग्रामस्थात संताप

दरम्यान महिला सरपंच पतीकडून झालेल्या या (Gram Panchayat) प्रकरणाचा ग्रामस्थांतून निषेध करण्यात येत आहे. पालकमंत्री ना. मेघनाताई बोर्डीकर यांच्या मतदार संघात हा प्रकार घडला आहे. त्यामुळे त्या या प्रकरणाची दखल घेतील, अशी अपेक्षा ग्रामस्थांतून व्यक्त केली जात आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article