बचत गटांच्या उत्पादनांना बाजारपेठ मिळण्यासाठी प्रयत्न करू : पालकमंत्री ॲड. आकाश फुंडकर

4 hours ago 1

अकोला : ‘व-हाडी जत्रा सरस प्रदर्शन’ व-हाडच्या सांस्कृतिक समृद्धीचे दर्शन घडविणारे असून, खेड्यापाड्यातील महिलाभगिनींच्या बचत गटांना या माध्यमातून व्यासपीठ मिळाले आहे. जिल्ह्यात बचत गटांच्या उत्पादनांना कायमस्वरूपी बाजारपेठ मिळण्यासाठी प्रयत्न करू, अशी ग्वाही राज्याचे कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. आकाश फुंडकर यांनी आज येथे दिली.

ग्रामविकास व पंचायतराज विभाग, उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानातर्फे लालबहादूर शास्त्री क्रीडांगणावर व-हाडची संस्कृती, खाद्यपदार्थ, ग्रामजीवन यांचे दर्शन घडविणा-या ‘व-हाडी जत्रा- २०२५’ उपक्रमाचा शुभारंभ पालकमंत्र्यांच्या हस्ते झाला. जिल्हाधिकारी अजित कुंभार, आमदार रणधीर सावरकर, वसंत खंडेलवाल, अमोल मिटकरी, जिल्हाधिकारी अजित कुंभार, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी बी. वैष्णवी, पोलीस अधिक्षक बच्चन सिंह, महापालिका आयुक्त सुनील लहाने, ग्रामीण विकास यंत्रणा प्रकल्प संचालक मनोज जाधव, जिल्हा अभियान व्यवस्थापक नरेंद्र काकड आदी उपस्थित होते.

ग्रामविकास व पंचायतराज विभाग उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, अकोला आयोजित वऱ्हाडी जत्रा - 2025 या मिनी सरस महोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्री ॲड. फुंडकर यांच्या हस्ते झाले. या उपक्रमात जिल्ह्यातील अनेक महिला स्वयंसहाय्यता गटांनी सहभागी होऊन विविध उत्पादने जत्रेत प्रदर्शित केली आहेत. पालकमंत्र्यांनी विविध कक्षांना भेट देऊन महिलाभगिनींशी संवादही साधला.

जिल्ह्यातील बचत गटांनी शाश्वत विकासाकडे वाटचाल करावी. बचत गटांना कायमस्वरूपी बाजारपेठ मिळण्यासाठी महिला बचत गट उत्पादनांचे विक्री भवन व्हावे. त्यासाठी निश्चित प्रयत्न करू, असे पालकमंत्र्यांनीही यावेळी सांगितले.

उपक्रमात बचत गटांची उत्पादने, खाद्यपदार्थ, वस्तू यांची दालने असून, रोज सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रमही होणार आहेत. शास्त्री क्रीडांगणावर दि. 31 जानेवारी ते 4 फेब्रुवारीदरम्यान स. ९ ते रात्री १० या वेळेत सर्वांसाठी खुली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article