वसमत (Purna Project) : येथील पूर्णा प्रकल्प पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनां मारहाण करण्याचा प्रकार घडला होता. या प्रकरणातील आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मारहाण करणार्याला दोन दिवस पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. शुक्रवारी आरोपीची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.
पूर्णाप्रकल्प पाटबंधारे विभागाचे (Purna Project) कार्यकारी अभियंता संतोष बिराजदार यांना कैलास निकाळजे यांनी बुधवारी मारहाण केली होती. या प्रकरणी कार्यकारी अभियंता संतोष बिराजदार यांच्या तक्रारीवरून कैलास निकाळजे विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला होता. पोलिसांनी याप्रकरणी आरोपीला अटक करून न्यायालयासोर उभे केले होते. न्यायालयाने दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली होती. पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर शुक्रवारी न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
याच (Purna Project) प्रकरणात निकळाजे यांनी अॅट्रासिटी कायद्यानुसार फिर्याद दिली होती. यावरून बिराजदार यांच्या विरोधात अॅट्रॉसिटीचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या गुन्ह्याची चौकशी करून पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. कार्यकारी अभियंता बिराजदार यांच्या विरोधात अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाल्याने विशेष पोलीस महानिरीक्षकांना भेटून निवेदन देण्यात असल्याचे कर्मचारी संघटनेच्या वतीने जाहीर करण्यात आले आहे.
कर्मचार्यांचे कामबंद आंदोलन मागे
सदर प्रकरणात निषेध नोंदवण्यासाठी कर्मचार्यांनी काम बंद आंदोलन सुरू केले होते. या (Purna Project) अंतर्गत कालवे बंद करण्याचा इशाराही कर्मचार्यांनी दिला होता. मात्र कार्यकारी अभियंता संतोष बिराजदार यांनी कर्मचार्यांना आंदोलना पासून प्रवृत्त करून कामकाज सुरू करण्याचे आवाहन केले. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत कर्मचार्यांनी आंदोलन मागे घेतले आहे. शुक्रवारपासून कामकाज सुरळीत सुरू झाले आहे.