Water Resources Department: ‘तावरजा’ कालव्यावरून शेतकऱ्यांमध्ये ‘कालवा-कालव’!

2 hours ago 1

‘जलसंपदा’ने केला शेतकऱ्यांचा रस्ता बंद!

महादेव कुंभार
लातूर (Water Resources Department) : जलसंपदा विभागाच्या आडमुठेपणाच्या धोरणामुळे लातूर व औसा तालुक्याच्या सीमेवर असलेल्या तावरजा मध्यम प्रकल्पाखालील शेतकऱ्यांमध्ये कालवा कालव सुरू झाली आहे. जलसंपदा विभागाने (Water Resources Department) या प्रकल्पाच्या दोन्ही कालव्याचे रुंदीकरण चालविले असून कालव्या खालून कालव्या वरती जाण्यासाठी शेतकऱ्यांना कोणतीही पर्यायी व्यवस्था न करता शेतकऱ्यांनी कालव्यांमध्ये केलेले तात्पुरते पूल उखडून टाकण्याचे काम चालविले आहे. यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी थेट पालकमंत्र्यांकडे तक्रार केली आहे. सध्या काढणी-मोडणीच्या दिवसांत शेतकऱ्यांचा रस्ता बंद केल्याने शेतीची कामे कशी करायची? असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा टाकला आहे.

लातूर व औसा या दोन्ही तालुक्यांमधील गावांतून तावरजा नदीच्या दोन्ही बाजूंनी डावा व उजवा कालवा जातो. ऐन पावसाळ्यात या कालव्याच्या रुंदीकरणाचे काम जलसंपदा विभागाने हाती घेतले. अत्यंत धीम्या गतीने हे काम सुरू आहे. हे काम करताना कालव्या खालून कालव्याच्या वरती असलेल्या आपल्या शेतात जाण्यासाठी अनेक शेतकऱ्यांनी तात्पुरता रस्ता केला. त्यासाठी काहीजणांनी तात्पुरते पूलही केले आहेत. साखर कारखान्यांचा गळीत हंगाम चालू असल्याने अनेक शेतकऱ्यांची ऊस तोडणी सुरू होती. ऊस वाहतुकीसाठी कालव्यामध्ये केलेले हे तात्पुरते पूल मोलाचे आहे.

ऊस वाहतुकीनंतर ज्या शेतकऱ्यांची (Water Resources Department) जमीन कालव्यामुळे विभागली गेली आहे, अशा सर्वच शेतकऱ्यांना आपल्या शेतीत सध्या रबी काढणी-मोडणीसाठी ये-जा करावी लागते. आपली गुरेढोरे ने-आण करावी लागते. मात्र सध्या जलसंपदा विभागाने हे तात्पुरते पूल उखडून काढण्याचे काम चालविले आहे. हे पूल काढण्यास या भागातील शेतकऱ्यांचा कोणताही विरोध नाही. मात्र कालव्या खालून कालव्याच्या वरती जाण्यासाठी जलसंपदा विभागाने पर्यायी व्यवस्था निर्माण करून देणे आवश्यक आहे, अशी भूमिका या भागातील शेतकऱ्यांची आहे. त्यासाठी संबंधित शेतकऱ्यांनी जलसंपदा विभागाच्या (Water Resources Department) सहाय्यक अभियंता व कार्यकारी अभियंता यांच्याकडे गा गाऱ्हाणेही मांडले. मात्र या कालव्यावरून शेतकऱ्यांना येजा करण्यासाठी कोणतीही पर्यायी व्यवस्था केली गेली नाही.

पालकमंत्र्यांसह खासदार व आमदारांकडे तक्रार

शुक्रवारी आलमला शिवारात कालव्यातील शेतकऱ्यांचे पूल उखडून टाकण्याचे काम सुरू झाले. त्यामुळे शेतकऱ्यांनी संबंधित अभियंत्यांना फोन लावण्याचा प्रयत्न केला. मात्र या अभियंत्यांनी शेतकऱ्यांचे फोन घेणे टाळले. याबाबत आलमला येथील (Water Resources Department) शेतकऱ्यांनी पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याकडे तक्रार केली आहे. शेतकऱ्यांना कालवा ओलांडण्यासाठी पर्यायी व्यवस्था करून मगच (Water Resources Department) जलसंपदा विभागाने शेतकऱ्यांचे पूल उखडून टाकावेत, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर तसेच यशाचे आमदार अभिमन्यू पवार यांच्याकडेही शेतकऱ्यांनी तक्रार करून न्याय मागितला आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article