तीन विद्यार्थिनींची धावत्या ऑटोतून उडी:एकीचा मृत्यू, दोघी गंभीर; हिंगोलीच्या राहोली पाटी शिवारातील घटना, उडी का मारली हे अस्पष्ट?

2 hours ago 1
हिंगोली ते नर्सी नामदेव मार्गावर राहोली पाटी शिवारात धावत्या ॲटोतून अचानक उडी मारलेल्या तीन विद्यार्थीनी पैकी एकीचा मृत्यू झाला असून दोघी गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांना उपचारासाठी हिंगोलीच्या शासकिय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून एकीवर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी नांदेडला हलविण्यात आले आहे. मात्र त्यांनी धावत्या ॲटोतून उडी का मारली याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंगोली शहरातील एका महाविद्यालयात इयत्ता आकरावी वर्गात शिक्षण घेणाऱ्या तीन विद्यार्थीनी आज दुपारच्या सुमारास हिंगोली येथून ॲटोतून एका विद्यार्थीनीच्या बहिणीकडे जात होत्या. सदर ॲटो हिंगोली ते नर्सी नामदेव मार्गावर राहोली पाटी शिवारात आल्यानंतर त्यापैकी अंजना तुकाराम कऱ्हाळे (रा. पार्डी, ता. कळमनुरी) हिने अचानक धावत्या ॲटोतून उडी मारली. त्यामुळे घाबरलेल्या दोघींनीही धावत्या ॲटोतून उडी मारली. यामध्ये अंजना सह अन्य दोघी रस्त्यावर पडून गंभीर जखमी झाल्या. सदर प्रकार त्या ठिकाणी असलेल्या गावकऱ्यांच्या लक्षात आला. या घटनेची माहिती मिळताच हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक शामराव डोंगरे, महिला पोलिस उपनिरीक्षक श्रीदेवी वग्गे, जमादार सुधीर ढेंबरे, अस्लम गारवे, नंदकुमार जाधव, प्रकाश कांबळे यांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिस व नागरीकांनी तिघींना उपचारासाठी हिंगोलीच्या शासकिय रुग्णालयात दाखल केले. मात्र अंजना हिचा मृत्यू झाल्याचे वैद्यकिय अधिकाऱ्यांनी जाहिर केले. दरम्यान, जखमी दोघींंवर प्राथमिक उपचार करण्यात आले असून एकीची प्रकृती गंभीर असल्याने तिला पुढील उपचारासाठी नांदेड येथे हलविण्यात आले आहे. या विद्यार्थीनींना ॲटोतून उडी का मारली हे अद्यापही स्पष्ट झाले नाही. तर पोलिसांनी ॲटो चालकाची चौकशी सुरु केली आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article