तेल्हारा (Telhara Police): तेल्हारा पोलिस स्टेशन हद्दीतील आडसूळ आठवडी बाजार येथे एसडीपीओ कार्यालय अकोट पोलिस पथकाने तर वरुड येथे तेल्हारा पोलिसांनी २९ जानेवारी रोजी सट्टेखोरांवर छापेमारी करून आरोपीच्या ताब्यातून कल्याण वरली मटका साहित्य, मोबाइल व नगदी असा ९ हजार ६२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
आडसूळ आठवडी बाजार येथे सार्वजनिक ठिकाणी काही इसम लोकांकडून कल्याण वरली मटक्याचे आकड्यावर पैसे घेऊन हारजीत चा खेळ चालवित असल्याची गुप्त माहितीवरून एएसपी अनमोल मित्तल यांना मिळाल्याने त्यांचे तोंडी आदेशाने उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयातील हेड कॉन्स्टेबल शेख नासिर शेख वहाब यांचे फिर्यादीवरून पथकातील पोलीस कॉन्स्टेबल व (Telhara Police) तेल्हारा पोलीस स्टेशन मधील पोलीस कॉन्स्टेबल यांच्या संयुक्त मदतीने २९ जानेवारी रोजी दुपारी ४ वाजेदरम्यान करण्यात आलेल्या छापेमारीत आमरोडवर पंचांसमक्ष सट्टेखोर ज्ञानदेव भास्कर कुरवाडे (३१) रा. सोनाळा पूर्णा, रामराव काशीराम गवारगुरु (६२) नवीन उमरी ता. तेल्हारा या दोन खायवाडी करणार्यांना जागेवरच पकडण्यात आले.
त्यांच्याकडून ८ हजार ६२० रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम १८८७ चे कलम १२ (अ) नुसार कारवाई करण्यात आली. तसेच वरुड येथील रोडवरील पुलावर कल्याण वरली मटक्याचे आकड्यावर पैशाची खायवाडी करणार्या कैलास श्रीराम तायडे (३०) रा. अकोली रूपराव यास (Telhara Police) पोलीस कॉन्स्टेबल सतीश भटकर यांचे फिर्यादीवरून सहाय्यक फौजदार जगदीश पुंडकर यांना मिळालेल्या गुप्त व खात्रीलायक माहितीच्या आधारे रंगेहात पकडण्यात आल्याची घटना २९ जानेवारी रोजी दुपारी ५ वाजेदरम्यान घडली. आरोपीच्या ताब्यात जुगार साहित्य व १ हजार २० रुपये असा नगदी मुद्देमाल मिळाला.