PM Awas Yojana: प्रधानमंत्री आवास योजना 2.0 रिसोड शहर वासियानी लाभ घ्यावा: ॲड. नकुल देशमुख

2 hours ago 1

रिसोड (PM Awas Yojana) : नगरपरिषद साठी प्रधानमंत्री आवास योजना २.० ची घोषणा केली असून त्या अनुसरून महाराष्ट्र शासनाने सर्वांसाठी घरे संकल्पनेवर  आधारित “प्रधानमंत्री आवास योजनेची शहरी – २.०” (PM Awas Yojana) राज्यात अंमलबजावणी करण्याबाबत शासन निर्णय जारी केला आहे. सदर योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन भाजप रिसोड मालेगाव विधानसभा निवडणुक प्रमुख ॲड. नकुल देशमुख यांनी केले आहे.

शासन निर्णयामध्ये खालील घटकांचा समावेश करण्यात आला आहे. वैयक्तिक स्वरुपातील घरकुल बांधकाम ज्या लाभार्थ्यांच्या नावावर जागा असेल अशा लाभार्थीसाठी,भागीदारी तत्वावरील परवडणारी घरे ज्या लाभार्थ्यांच्या नावावर जागा नाही अशा लाभार्थी साठी  शासकीय जमिनीवर गृहनिर्माण प्रकल्प अथवा खाजगी जमिनीवर खाजगी विकसकाव्दारे गृह प्रकल्प तयार करून परवडणाऱ्या घरांची  निर्मिती,व्याज अनुदान योजना नवीन घर खरेदी करणे किंवा घर बांधकाम करताना कर्ज घेणाऱ्यांसाठी व्याज अनुदान – मे. केंद्र शासन व बँक यांचेशी संबंधीत या अनुषंगाने (PM Awas Yojana) “प्रधानमंत्री आवास योजनेची (शहरी) २.०” राज्यात अंमलबजावणी करणे “प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) २.०” अंतर्गत लाभार्थी सुनिश्चित करण्यासाठी मे. केंद्र शासनाने एक युनिफाईड वेब पोर्टल विकसित केले आहे.

https://pmaymis.gov.in/PMAYMIS2_2024/PMAY_SURVEY/EligiblityCheck.aspx सदर पोर्टल वर इच्छुक लाभार्थीची नोंदणी करणे आवश्यक आहे.यासाठी पात्रता अशी की,कुटुंबामधील कोणत्याही सदस्यांचे नावावर देशाच्या कुठल्याही शहरात पक्के घर नसावे,लाभार्थी कुटुंबामध्ये पती-पत्नी व अविवाहित मूल / मुली  वय वर्ष १८ खालील मुल/मुली यांचा समावेश असेल,अर्जदारांनी गेल्या २० वर्षात कोणत्याही घरकुलाशी संबंधित शासकीय योजनेचा लाभ घेतलेला नसावा.

वेब पोर्टलवर नोंदणी करणे करिता लागणारी कागदपत्रे अर्जदाराचे आधार कार्ड मोबाईल नंबर लिंक असलेले, कुटुंबातील इतर सदस्याचे आधार कार्ड आधार कार्ड नुसार नाव, जन्म तारीख, आधार नंबर, उत्पनाचा दाखला तहसीलदार यांचे सहीचा चालू वर्षाकरिताचा,पासबुक आधार लिंक केले असलेले,जात प्रमाणपत्र (एस.सी,  एस.टी.  व  ओ.बी.सी. करिता), जमिनीची कागदपत्रे – सिटी सर्वे उतारा नमूना ड, खरेदी , ७/१२, न.प. कर भरणा पावती (जर आपण घटक क्र. ०१ अंतर्गत अर्ज करणार असाल तर),वार्षिक उत्पन्न मर्यादा ३.० लक्ष रुपये कमाल राहील (जर आपण घटक क्र. ०१ अंतर्गत अर्ज करणार असाल तर),पी.एम. स्वनिधी, इमारत बांधकाम कामगार, पी. एम. विश्वकर्मा इत्यादी योजनेचा लाभार्थी असल्यास नोंदणी क्रमांक प्रत जोडणे आवश्यक आहे.

वरील संपूर्ण कागदपत्रांच्या मुळ प्रती सह ऑनलाइन नोंदणी करून (PM Awas Yojana) प्रधानमंत्री आवास योजना (शहरी)२.० योजनेचा लाभ घेण्याकरीता भाजप रिसोड मालेगाव विधानसभा निवडणुक प्रमुख ॲड नकुल देशमुख यांनी केले आहे. याबाबतीत अधिक माहितीकरीता प्रधानमंत्री आवास योजना कक्ष, बांधकाम विभाग, नगरपरिषद रिसोडे येथे संपर्क साधण्याचे आवाहन भाजप नेते ॲड नकुल देशमुख यांनी केले आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article