पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांनी अंभोरा ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यांसोबत कर्मचाऱ्यांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित केले. Pudhari Photo
Published on
:
31 Jan 2025, 2:41 pm
Updated on
:
31 Jan 2025, 2:41 pm
आष्टी : तालुक्यातील अंभोरा पोलिसांनी वाहिरा येथील दुहेरी हत्याकांड, जबरी चोरी, घरफोडी प्रकरणातील आरोपींना तात्काळ अटक करून आरोपींकडून १४ गुन्ह्यांची उकल केली. हद्दीत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ दिला नसल्याने पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांनी अंभोरा ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यांसोबत कर्मचाऱ्यांचे कौतुक करत प्रशस्तीपत्र देऊन मंगळवारी सन्मानित केले.
मंगळवारी पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांनी प्रभारी अधिकारी मंगेश साळवे यांच्यासह पोलीस हवालदार बाबासाहेब गर्जे, पोलीस अंमलदार शिवदास केदार, सुदाम पोकळे, यांच्यासह कर्मचाऱ्यांचे कौतुक करत प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित केले. अंभोरा पोलीस स्टेशनच्या पुर्ण टीमचे यश आहे. अंभोरा पोलिस स्टेशन हद्दीत काम करताना हद्दीत कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी व चोरी, घरफोडी, जबरी चोरीतील आरोपीना मोठ्या शिताफिने पकडून अटक केली. त्याबद्दल पोलीस अधीक्षक यानी कौतुक केले. हे यश माझ्या एकट्याचे नव्हे तर पुर्ण टीमचे असल्याचे सहायक पोलीस निरीक्षक मंगेश साळवे यांनी सांगितले. याबद्दल अंभोरा पोलीस स्टेशनच्या प्रभारी अधिकाऱ्यांसह सर्व पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे.