दोन गंभीर जखमी; कारण अस्पष्ट
हिंगोली (Hingoli Accident) : हिंगोली ते नर्सी नामदेव मार्गावर राहोली पाटी शिवारात धावत्या अॅटोतून अचानक उडी मारलेल्या तीन विद्यार्थीनी पैकी एकीचा मृत्यू झाला असून दोघी गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांना उपचारासाठी (Hingoli Accident) हिंगोलीच्या शासकिय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून एकीवर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी नांदेडला हलविण्यात आले आहे. मात्र त्यांनी धावत्या अॅटोतून उडी का मारली याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, (Hingoli Accident) हिंगोली शहरातील एका महाविद्यालयात इयत्ता अकरावी वर्गात शिक्षण घेणार्या तीन विद्यार्थीनी 31 जानेवारी रोजी दुपारच्या सुमारास हिंगोली येथून अॅटोतून एका विद्यार्थीनीच्या बहिणीकडे जात होत्या. सदर अॅटो हिंगोली ते नर्सी नामदेव मार्गावर राहोली पाटी शिवारात आल्यानंतर त्यापैकी अंजना तुकाराम कर्हाळे (रा. पार्डी, ता. कळमनुरी) हिने अचानक धावत्या अॅटोतून उडी मारली. त्यामुळे घाबरलेल्या दोघींनीही धावत्या अॅटोतून उडी मारली.
यामध्ये अंजना सह अन्य दोघी रस्त्यावर पडून गंभीर जखमी झाल्या. सदर प्रकार त्या ठिकाणी असलेल्या गावकर्यांच्या लक्षात आला. या (Hingoli Accident) घटनेची माहिती मिळताच हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक शामराव डोंगरे, महिला पोलिस उपनिरीक्षक श्रीदेवी वग्गे, जमादार सुधीर ढेंबरे, असलम गारवे, नंदकुमार जाधव, प्रकाश कांबळे यांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली.
पोलिस व नागरीकांनी तिघींना उपचारासाठी (Hingoli Accident) हिंगोलीच्या शासकिय रुग्णालयात दाखल केले. मात्र अंजना कर्हाळे हिचा मृत्यू झाल्याचे वैद्यकिय अधिकार्यांनी जाहिर केले. दरम्यान, जखमी दोघींवर प्राथमिक उपचार करण्यात आले असून एकीची प्रकृती गंभीर असल्याने तिला पुढील उपचारासाठी नांदेड येथे हलविण्यात आले आहे. या विद्यार्थीनींना अॅटोतून उडी का मारली हे अद्यापही स्पष्ट झाले नाही. तर पोलिसांनी अॅटो चालकाची चौकशी सुरु केली आहे.