आरवली सोन्सुरे येथे साकारलेले श्री गणपतीचे आकर्षक वाळूशिल्प
Published on
:
31 Jan 2025, 5:22 pm
Updated on
:
31 Jan 2025, 5:22 pm
वेंगुर्ले : वेंगुर्ले तालुक्यातील आरवली सोन्सूरे येथील रविराज चिपकर या तरूणाने गणेश जयंती निमित्त गणपतीचे दोन फूट उंचीचे आकर्षक वाळूशिल्प साकारले आहे.
चिपकर याने सन २०११ पासून मालवण चिवला बीच येथील पर्यटन महोत्सवाच्या माध्यमातून सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांचे वाळूशिल्प साकारले होते. त्यानंतर त्याने लता मंगेशकर, सिंधुताई संकपाळ, रतन टाटा अशा अनेक थोरा-मोठ्यांची वाळूशिल्पे साकारली. आंतरराष्ट्रीय वाळूशिल्पसाठी चिपकर याची ओडिसा येथे महाराष्ट्रातून एकमेव निवड झाली होती. राष्ट्रीय स्तरावर त्याने २०१८ पासून २०२२ पर्यंत सहभाग घेतला होता. त्यांच्या या कलेचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.