रेल्वे विभागानने यशस्वी तिकीट तपासणी मोहीम राबविल्यामुळे महसूल वाढला आणि प्रवासी अनुपालन
विशेष मोहिमेत 1 महिला RPF अधिकाऱ्यासह 03 RPF कर्मचाऱ्यांसह एकूण 28 तिकीट तपासणी कर्मचारी तैनात
तिकीट नसलेले प्रवासी, अनियमित प्रवासी आणि सामान बुक न केलेले एकूण 484 प्रवाशांकडून एकूण रु. 2,53,075/- महसूल प्राप्त
हिंगोली (Hingoli railway station) : एन. सुब्बा राव, सहाय्यक वाणिज्य व्यवस्थापक-II नांदेड यांच्या देखरेखीखाली सर्वसमावेशक बस छापा (मोबाईल आणि ॲम्बुश तिकीट तपासणी मोहीम) घेण्यात आली. ज्यामध्ये मुदखेड हे बेस स्टेशन होते.ज्यात रेल्वे सुरक्षा बल आणि संचालन विभागांचा सहभाग होता. तिकीटविरहित प्रवासाला आळा घालणे आणि महसूल संकलन वाढवणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. या (Hingoli railway station) विशेष मोहिमेत 1 महिला RPF अधिकाऱ्यासह 03 RPF कर्मचाऱ्यांसह एकूण 28 तिकीट तपासणी कर्मचारी तैनात करण्यात आले होते.
गाड्यांची तपासणी केली:
सकाळच्या सत्रात मुदखेड ते आदिलाबाद विभागातील 9 गाड्यांची तपासणी करण्यात आली. ज्यामध्ये (Hingoli railway station) नंदीग्राम एक्सप्रेस, देवगिरी एक्सप्रेस, इंटरसिटी एक्सप्रेस इत्यादींचा समावेश होतो. संध्याकाळच्या सत्रात पूर्णा-वाशिम सेक्शनमध्ये पाटणा एक्स्प्रेस, जयपूर एक्स्प्रेस इत्यादींसह 4 गाड्यांची तपासणी करण्यात आली. जांबळी येथे ट्रेन क्रमांक 17409 आदिलाबाद-नांदेड इंटरसिटी एक्स्प्रेसची तपासणी करण्यात आली. या (Hingoli railway station) मोहिमेदरम्यान काही प्रवाशांना विना तिकीट प्रवास करताना आणि अनियमित तिकिटावर प्रवास करताना पकडले. तिकीट तपासणी मोहिमेचा परिणाम म्हणून, तिकीट नसलेले प्रवासी, अनियमित प्रवासी आणि सामान बुक न केलेले एकूण 484 प्रवाशांकडून एकूण रु. ₹ 2,53,075/- महसूल प्राप्त झाला.
या तिकीट तपासणी मोहिमेचा परिणाम UTS बुकिंग विंडो विक्रीवर पुढील प्रमाणे झाला:
मुदखेड स्थानकात 59 % प्रवासी वाढ, महसुलात 22 % वाढ आदिलाबाद स्थानकावर प्रवाशांमध्ये 11 % आणि महसुलात 55 % आणि (Hingoli railway station) हिंगोली स्थानकावर प्रवाशांमध्ये 60 % आणि महसुलात 36 % वाढ नोंदवली गेली. श्रीमती. नीती सरकार, विभागीय रेल्वे व्यवस्थापक, नांदेड यांनी प्रवाशांना आवाहन केले आहे की, प्रवाशांनी वैध तिकीट घेऊनच प्रवास करावा आणि अनधिकृत फेरीवाल्यांकडून कोणतेही खाद्यपदार्थ खरेदी करू नये असे आवाहन नांदेड जनसंपर्क विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.