'विश्व मराठी संमेलन 2025'चे उद्घाटन:देवेंद्र फडणवीस, अजित पवार, एकनाथ शिंदेंची उपस्थिती; मुख्यमंत्र्यांकडून AI स्मॉल लँग्वेजचा वापर करण्याचे आवाहन

2 hours ago 1
आज आर्टिफिशियल इंटेलिजन्स आज बोलबाला आहे, तंत्रज्ञान हे घोडे प्रमाणे असते त्यावर स्वार होऊन आपले विचार जगभरात नेले पाहिजे. मराठी भाषा विभागाने आर्टिफिशियल इंटेलिजन्स वापर करून स्मॉल लँग्वेज भाषा निर्माण करून अभिजात साहित्य सर्व पर्यंत पोहोचवावे.पुढील पाच वर्षांत कोणत्या शहरात किंवा देशात विश्व मराठी संमेलन घेता येईल याबाबत विचार विनिमय करण्यात येईल. लंडन मराठी मंडळ यांना 15 दिवसात जागा पाहिजे त्यासाठी मदत केली जाईल. त्याचप्रमाणे दिल्ली येथील मराठी शाळांना मदत केली जाईल असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. फर्ग्युसन महाविद्यालय येथे पार पडत असलेल्या विश्व मराठी संमेलन उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ,उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मराठी भाषा आणि उद्योग मंत्री उदय सामंत, विधान परिषद उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे, मधू मंगेश कर्णिक, डॉ.सदानंद मोरे,राज्यमंत्री माधुरी मिसाळ, खासदार श्रीरंग बारणे, रवींद्र शोभणे, तारा भवाळकर,मनीषा म्हैसकर , ज्ञानेश्वर मुळे, डॉ लक्ष्मीकांत देशमुख, संजय नहार,राजेश पांडे उपस्थित होते. याप्रसंगी पहिला विश्व मराठी साहित्य भूषण पुरस्कार जेष्ठ लेखक मधु मंगेश कर्णिक यांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरवातीला बालगंधर्व रंगमंदिर ते फर्ग्युसन महाविद्यालय यादरम्यान शोभायात्रा पार पडली. फडणवीस म्हणाले, पुणे हे विद्येचे माहेरघर आहे पुण्याची मराठी प्रमाण मराठी आहे त्याठिकाणी विश्व मराठी संमेलन होणे आनंदी बाब आहे. अभिजात दर्जा मिळाल्यावर हे पहिले संमेलन आहे. सर्जनशील आणि बहुआयामी व्यक्तिमत्त्व मधु मंगेश कर्णिक आहे त्यांचा सत्कार होणे महत्वपूर्ण आहे. मराठी चा विचार करताना स्वातंत्रवीर सावरकर यांच्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाही कारण सावरकर यांनी शब्दांचा खजिना त्यांनी मराठी भाषेला दिला आहे. दिल्ली मध्ये प्रथमच मराठी साहित्य संमेलन होत आहे ही प्रशंसनीय बाब आहे. काही लोकांनी साहित्य, नाट्य संमेलन असेल की वाद निर्माण होतात पण ते जिवंतपणाचे लक्षण आहे, त्यातून मंथन होत असते. मराठी माणसाला कलह करण्यास आवडतो त्यातून आणखी चांगले करण्याची ऊर्जा मिळते. जगात सर्व ठिकाणी मराठी भाषिक पोहचला आहे. मराठी माणूस परदेशात गेला तरी पुढील पिढीत मराठी भाषा रुजवली जाते आहे. मी पुन्हा येईन शब्द माझा पिच्छा सोडत नाही दादा..त्याचा वेळ आणि काळ वेगळा असतो तसा त्याचा अर्थ बदलतो. पूर्वी उपहस्त्मक पद्धतीने याबाबत बोलले जात पण आता चांगल्या अर्थाने बोलले जात आहे. एखादा शब्द आपल्याला जोडला की तो सुटत नाही.त्यामुळे मी मराठी विश्व संमेलन मध्ये पुन्हा येईन...पुन्हा येईन..पुन्हा येईन.. आज मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला हे राज मान्यता मिळाल्याचे लक्षण आहे. मराठी माणूस कधी स्वार्थी राहिला नाही, मराठी माणूस हा पानिपत मध्ये राज्य वाढवण्यासाठी गेले नाही तर देशाचे रक्षण करण्यास गेले. मराठी माणूस जगात कुठे ही असला तरी त्याची कीर्ती जगात सर्वत्र आहे. संत साहित्य यातून सामान्य माणसाला जगण्याचा अधिकार मिळाला. अनेक अभिमानाचे लोक राज्यात होऊन गेले असून सध्या देखील आहे. मराठी भाषेला जगात सर्वत्र पोहचवणे काम आपण करावे. मराठी साहित्य , रंगभूमी जतन करून ठेवले ते पुढे घेऊन गेले पाहिजे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article