Nashik | बॅंकेत बसण्यास जागा न मिळाल्याने चक्कर येऊन गर्भवती महिलेचा मृत्यू, उमराळे येथील घटना

2 hours ago 1

सुमारे दोन ते तीन तास रांगेत उभे राहावे लागल्याने महिलेला भोवळ आली. Image Source (Meta AI)

पुढारी वृत्तसेवा

Published on

31 Jan 2025, 10:14 am

Updated on

31 Jan 2025, 10:14 am

जानोरी (जि. नाशिक) | उमराळे येथील एका राष्ट्रीयकृत बॅंकेत पैसे काढण्यासाठी आलेल्या आदिवासी गरोदर महिलेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पैसे काढण्यासाठी व केवायसी करण्यासाठी बॅंकेत आलेली महिला बॅंकेत गर्दी असल्याने सुमारे दोन ते तीन तास रांगेत उभी होती. दरम्यान चक्कर येऊन पडल्याने महिलेला रुग्णालयात हलवण्यात आलं मात्र, महिलेचा मृत्यू झाला आहे.

उमराळे बुद्रुक हे 40 ते 50 गावांचे केंद्रबिंदू आहे. येथील बँक या सगळ्या गावांना जोडली असल्यामुळे मोठ्या प्रमाणात गर्दी होते. मात्र, बॅंकेत कर्मचाऱ्यांचा अभाव आहे. बँकेत लाडकी बहिणीचे पैसे काढण्यासाठी व केवायसी करण्यासाठी झालेला विलंब व या कारणाने गरोदर महिलेचा मृत्यू झाल्याने मयत महिलेस बँकेकडून भरपाई द्यावी, अशी मागणी दिंडोरी पंचायत समिती माजी सभापती वसंत थेटे, विठ्ठलराव आपसुंदे, सरपंच भोये, संजय सोनवणे, शशी गामणे, भास्कर बोके, मुरलीधर बोके, हरिदास लिलके (सरपंच), मोतीराम बोके यांनी बँकेकडे केली आहे.

संबंधित 'बँक ऑफ महाराष्ट्र' मध्ये सतत कर्मचाऱ्यांचा अभाव असल्यामुळे येथील बँकेमध्ये पैसे काढण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी असते. ही बँक 40 ते 50 गावांना जोडली असल्यामुळे मोठ्या प्रमाणात गर्दी होते. त्यामुळे येथे खातेदारांना तासन तास रांगेत उभे राहावे लागते. त्यामुळे आशा घटना घडल्यास बँक त्याला जबाबदार राहील.

वसंत थेटे, दिंडोरी पंचायत समिती सभापती

बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये लाडकी बहीण योजना सुरू झाल्यापासून चक्कर आल्याने आतापर्यंत वीस ते पंचवीस गरोदर महिलांना प्राथमिक केंद्रामध्ये तपासण्यात आले. बँक ऑफ महाराष्ट्र शाखेत गर्दी होत असेल तर ग्रामपंचायत हॉलमध्ये लाडकी बहीण व इतर योजना राबवाव्या. कर्मचारी वाढवावे.

संजय सोनवणे

बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये खातेदार यासाठी स्वतंत्र विभाग करून त्याचे आर्थिक व्यवहार केले जातील तसेच कर्मचारी याची संख्या वाढविणार असून, त्यासाठी मुख्य संबंधित अधिकारी यांना पत्रव्यवहार करणार आहे.

समीर होरा, बँक मॅनेजर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article