सुरेश धस यांना बुट्ट्या गायकवाड प्रकरणात अटक करा:गुणरत्न सदावर्ते यांची मागणी; या हत्येची शस्त्रे धस यांच्या शेतात सापडली होती का? असा सवाल
2 hours ago
1
मस्साजोगचे सरपंच संतोष गायकवाड यांच्या हत्या प्रकरणात अवघा महाराष्ट्र पेटवणाऱ्या सुरेश धस यांना बुट्ट्या गायकवाड हत्याकांडाप्रकरणी अटक करण्याची मागणी वकील गुणरत्न सदावर्ते यांनी केली आहे. त्यांच्या या मागणीमुळे बीडचे राजकारण आणखीनच तापण्याची चिन्हे आहेत. गुणरत्न सदावर्ते शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, बुट्ट्या गायकवाड यांची बीडमध्ये निर्घृण हत्या झाली होती. हे प्रकरण संतोष देशमुख हत्या प्रकरणापेक्षा खूप गंभीर आहे. या प्रकरणात केंद्रे नामक पोलिस कॉन्स्टेबलने तपास केला. त्यांनी या प्रकरणी स्पष्टपणे भाष्य केले आहे. ते या प्रकरणातील एक महत्त्वाचे साक्षीदार आहेत. या प्रकरणी कोर्टात धाव घेण्यापूर्वी मी म्हणेन की, सुरेश धस यांच्यासह त्यांची पत्नी आणि या संपूर्ण घटनाक्रमाविषयी तातडीने पाऊले उचलावीत. सुरेश धस यांना अटक करावी. कारण, त्यांच्या बाबतीतल्या या संपूर्ण गोष्टी पुसून टाकण्याचा प्रयत्न होण्याची शक्यता आहे. त्याुमअळे या प्रकरणातील साक्षीदार सुरक्षित रहावेत यासाठी प्रयत्न केले जावेत अशी माझी मागणी आहे. बुट्ट्या गायकवाड प्रकरणात आरोपींनी वापरलेली शस्त्रे सुरेश धस यांच्या शेतात सापडली होती का? सुरेश धस यांच्या पत्नीने आरोपींना पळून जाण्यासाठी 3 लाख रुपये दिले होते का? असे विविध सवालही गुणरत्न सदावर्ते यांनी या प्रकरणी उपस्थित केलेत. काय आहे बुट्ट्या गायकवाड हत्या प्रकरण? राष्ट्रवादी काँग्रेसचे आष्टीचे पदाधिकारी भाऊसाहेब लटपटे यांनी काही दिवसांपूर्वी बुट्ट्या उर्फ संजय गायकवाड यांच्या हत्येचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यांच्या मते, आष्टी तालुक्यातील बुट्ट्या गायकवाड या आदिवासी तरुणाची युवकाची 2014 मध्ये निर्घृण हत्या करण्यात आली होती. पोलिसांनी या प्रकरणात वापरण्यात आलेली शस्त्रे आमदार सुरेश धस यांच्या शेतातून जप्त केली होती. यासंबंधी मयत गायकवाड यांच्या पत्नीने पोलिसांत तक्रार दाखल केली होती. त्यात या प्रकरणातील आरोपींची नावे स्पष्टपणे सांगितले होती. पण नंतर पोलिसांनी तक्रारदार महिलेला दमदाटी करून हे प्रकरण दाबले होते. आदिवासी कुटुंबाला न्याय मिळावा अशी आमची मागणी आहे. आमदार सुरेश धस यांनीही स्वतःची गुंडांची टोळी तयार केली असून, ते सुद्धा गुंडांना साभाळत आहेत, असा दावाही भाऊसाहेब लटपटे यांनी केला होता. आता पाहू सरपंच संतोष देशमुख हत्याकांड बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची गत 9 डिसेंबर रोजी निर्घृण हत्या झाली होती. या प्रकरणी विष्णू चाटे, जयराम चाटे, महेश केदार, प्रतीक घुले, सुदर्शन घुले, सुधीर सांगळे यांना अटक करण्यात आली आहे. कृष्णा आंधळे हा एकमेव आरोपी या प्रकरणात फरार आहे. पोलिस त्याचा कसून शोध घेत आहेत. देशमुख हत्या प्रकरणाशी संबंधित खंडणी प्रकरणात वाल्मीक कराड याला अटक करण्यात आली आहे. या सर्वांवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. वाल्मीक हा राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय आहे. त्यामु्ळे बीडच्या सर्वपक्षीय नेत्यांनी मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)