मधु मंगेश कर्णिक यांना विश्व मराठी साहित्यभूषण पुरस्कार:विश्व मराठी संमेलन आता मुंबई-पुण्याबाहेर नेण्याचे उपमुख्यमंत्र्यांचे आवाहन

2 hours ago 1
पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयात आयोजित विश्व मराठी संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्यात ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांना पहिला विश्व मराठी साहित्यभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. या प्रसंगी बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विश्व मराठी संमेलन केवळ मुंबई-पुणे परिसरापुरते मर्यादित न ठेवता छत्रपती संभाजीनगर, नाशिक, नागपूर, रत्नागिरी आणि परदेशातही आयोजित करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. बालगंधर्व रंगमंदिर ते फर्ग्युसन महाविद्यालयापर्यंत भव्य शोभायात्रा काढण्यात आली. उपमुख्यमंत्री पवार यांनी मराठी माणसाच्या मनातील न्यूनगंड दूर करण्यात या संमेलनाची भूमिका महत्त्वाची असल्याचे सांगितले. जगभरात स्थायिक झालेले मराठी भाषिक आपल्या मातृभाषेचा गौरव वाढवण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी नमूद केले. मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी मराठी भाषेला मिळालेल्या अभिजात दर्जाचा उल्लेख करत, ही भाषा दोन हजार वर्षांपूर्वीची असल्याचे सिद्ध झाल्याचे सांगितले. युवा पिढीने मराठी अस्मिता जपण्याची जबाबदारी घेतली पाहिजे असे आवाहनही त्यांनी केले. रत्नागिरीतील केशवसुतांच्या मालगुंड गावाला पुढील वर्षी 'पुस्तकांचे गाव' म्हणून मान्यता देण्यात येणार असल्याची घोषणाही यावेळी करण्यात आली. ज्या गावात मराठी भाषेला ताकद देणारी व्यक्ती जन्माला आली असेल त्या गावाला पुस्तकांचे गाव करण्याचा आमचा मानस आहे. काही लोक मराठी भाषेला जाणीवपूर्वक त्रास देण्याचा प्रयत्न करत आहे त्याबाबत कडक कायदा झाला पाहिजे. परदेशातून येणाऱ्या मराठी भाषिक यांना सरकार तिकिटासाठी मदत करते पण काहीजण त्यावर प्रश्न उपस्थित करत आहे. परदेशात पूर्वी 17 मराठी बृहन मराठी मंडळ होती त्यात आता 8 मंडळाची अतिरिक्त भर पडली आहे. म्हैसकर म्हणाले, तीन ऑक्टोबर 2024 रोजी मराठी भाषेला अभिजात दर्जा केंद्र सरकारकडून मिळाला आणि अनेक वर्षाचे आपले स्वप्न साकार झाले. मराठी भाषा विभाग 2010 मध्ये स्थापन झाला आणि मराठी भाषा संवर्धन काम केले जात आहे. विश्व मराठी संमेलन हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे होत आहे ही आनंदाची बाब आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article