भाजपच्या हाती सत्ता गेल्यापासून राज्य जाती-जातीमध्ये फाडून टाकले:फडणवीसांनी मराठा VS ओबीसी वादाला खतपाणी घालू नये- संजय राऊत

3 hours ago 1
महाराष्ट्रात जातीय राजकारण सुरू झाले आहे. भाजपच्या हाती सत्ता गेल्यापासून राज्य जाती-जातीमध्ये फाडून टाकला आहे. दुर्दैवाने देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री आहे. त्यांनी तरी मराठा विरुद्ध ओबीसी अशा वादाला खतपाणी घालू नये. या राजकारणामुळे भाजपला चांगले दिवस आले आहे, असा आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. संजय राऊत म्हणाले की, धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावरुन टोलवाटोलवी सुरू आहे. अमित शहा देशाचे गृहमंत्री आहेत ते काय करत आहे. त्यांनी EVM सेट केल्याने महाराष्ट्रात ही परिस्थिती आली आहे, असा टोलाही त्यांनी लगावला आहे. तर ही लोकं महाराष्ट्रातील जनतेला वेडे समजत आहे असेही त्यांनी म्हटले आहे. ..त्यांना कायदा नरम संजय राऊत म्हणाले की, देशात आणि राज्यात जातीचे राजकारण सुरू आहे. ज्यांच्यामागे जातीचे पाठबळ आहे त्यांना आपला कायदा हात लावत नाही, कारण मत हातून जातील. देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांची तीच भूमिका आहे. ज्या वक्तीच्या मागे जातीची मते आहेत त्याला कायदा नरम आणि वाकलेला असतो. मुख्यमंत्री, गृहमंत्री, उपमुख्यमंत्री कुणी काय केले की नाही हे त्या नेत्यांच्या जातीची ताकद पाहून ठरवत आहे. ..त्यांची इतिहासात नोंद होत नाही संजय राऊत म्हणाले की, संकट काळात जे पळून जातात त्यांची इतिहासात नोंद राहत नाही. कालच राज ठाकरे यांनी जी भूमिका मांडली आहे की मते कुठे गेली ते समजत नाही, तसेच माणसं त्यांच्याकडे जात आहे, हे देखील रहस्य आहे. जे आईला सोडून जातात त्यांनी गंगेत कितीही डुबक्या मारल्या तरी त्यांचे पाप धुतल्या जात नाही असा टोलाही राऊत यांनी लगावला आहे. सामंतांचेच कधी ऑपरेशन होईल सांगता येत नाही उदय सामंत यांचेच कधी ऑपरेशन होईल सांगता येत नाही. देशात केवळ सत्ता आणि पैसा हेच राजकारण सुरू आहे. तपास यंत्रणांच्या कारवाईची भीती यातून हे सगळे होत आहे, आम्ही सर्व गोष्टीवर लक्ष ठेवून आहोत, असे ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी म्हटले आहे. साळवी जातील असे वाटत नाही संजय राऊत म्हणाले की, राजन साळवी यांच्याशी मी कालच बोललो पण मला ते पक्ष सोडून जातील असे काही जाणवले नाही. ते अजूनही म्हणतात की बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसैनिक आहे, माझ्या डोक्यात असा काही विचार नाही. आम्ही आमच्या सहकाऱ्यांवर विश्वास ठेवतो.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article