मुंबई (Mumbai) : 26/11 म्हणजेच 2008 मध्ये मुंबईत झालेला हल्ला. 26 नोव्हेंबरच्या रात्री अतिरेक्यांच्या दहशतीने संपूर्ण मुंबई हादरली होती. मुंबईत दहशतवाद्यांनी जी दहशत माजवली होती, त्या दिवसाच्या आठवणी आजही ताज्या आहेत आणि लोकांच्या डोळ्यात पाणी आणतात.
4 दिवसांच्या ऑपरेशनमध्ये भारतीय सुरक्षा दलांनी 9 दहशतवाद्यांचा खात्मा
26 नोव्हेंबर 2008 चा तो काळा दिवस… या दिवशी पाकिस्तानातील 10 लष्कर-ए-तैयबाच्या दहशतवाद्यांनी मुंबईवर हल्ला केला आणि 4 दिवस गोळीबार (Firing) करण्याव्यतिरिक्त अनेक ठिकाणी स्फोट (Explosion) घडवले. या हल्ल्यात 160 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता, तर 600 हून अधिक लोक जखमी झाले होते. मुंबईला हादरवून सोडणाऱ्या या हल्ल्याला आज 16 वर्षे उलटून गेली आहेत, पण त्या दिवसाच्या आठवणी आजही ताज्या आहेत. 4 दिवसांच्या ऑपरेशनमध्ये भारतीय सुरक्षा दलांनी 9 दहशतवाद्यांचा खात्मा केला, तर आमिर अजमल कसाबला जिवंत पकडण्यात आले, त्याला 2012 मध्ये फाशी देण्यात आली होती.
ताज हॉटेलचे 400 कोटी रुपयांहून अधिक नुकसान
29 नोव्हेंबर 2008 मध्ये मुंबईतील ताजमहाल हॉटेलवर दहशतवाद्यांनी (Terrorist) हल्ला केला. तेव्हा गोळीबारात भारतीय लष्कराच्या जवानांनी पुढाकार घेतला होता. हल्ल्यादरम्यान ताज हॉटेलमध्ये सुमारे 450 पाहुणे उपस्थित होते आणि येथे 4 दिवस कारवाई सुरू होती. 26/11 हल्ल्यात मुंबईतील ताज हॉटेलचे 400 कोटी रुपयांहून अधिक नुकसान झाले होते आणि या हल्ल्यात अनेक लोकांचा मृत्यू झाला होता. तर अनेक जण जखमी झाले. दहशतवादी हल्ल्यानंतर ताज हॉटेलच्या (Taj Hotel) घुमटातून निघणारा धूर ही मुंबई दहशतवादी हल्ल्याची ओळख बनली.
खचाखच भरलेल्या छत्रपती शिवाजी रेल्वे स्थानकावर दहशतवाद्यांनी मोठा गोंधळ घातला
26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबईतील छत्रपती शिवाजी रेल्वे स्थानकावर अज्ञात हल्लेखोरांनी केलेल्या गोळीबारात सुमारे 58 जणांचा मृत्यू झाला होता.
गर्दीने खचाखच भरलेल्या छत्रपती शिवाजी रेल्वे स्थानकावर दहशतवाद्यांनी मोठा गोंधळ घातला होता. देशातील सर्वात वर्दळीच्या रेल्वे स्थानकांपैकी एक असलेल्या मुंबईच्या छत्रपती शिवाजी टर्मिनसवर जेव्हा हल्ला झाला तेव्हा मोठ्या संख्येने प्रवासी उपस्थित होते आणि हल्लेखोरांनी अंदाधुंद गोळीबार केला, ज्यानंतर जास्तीत जास्त 58 लोक मारले गेले. या कारवाईदरम्यान इस्माईल खानला सुरक्षा दलांनी ठार केले, तर अजमल आमिर कसाबला पकडले. कसाबविरुद्धचा खटला बराच काळ चालला आणि त्यानंतर न्यायालयाने त्याला फाशीची शिक्षा (Capital Punishment) सुनावली. त्यानंतर 21 नोव्हेंबर 2012 रोजी पुण्याच्या येरवडा (Yerwada) कारागृहात (Prison) त्यांना फाशी देण्यात आली.